logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगावात मोकाट जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ​प्रशासनाने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा ​खामगाव : वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शहरातील गायी व इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच जनावरांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ होत असून शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाता' दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती बिकट आहे. तसेच, रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले प्लास्टिक खाल्यामुळे अनेक जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ​गौ तस्करी आणि बेजबाबदार मालकांवर कारवाईची मागणी अनेक पशुपालक आपली जनावरे दूध काढल्यानंतर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. या बेवारस परिस्थितीचा फायदा घेऊन शहरात गौ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी जे मालक जनावरे रस्त्यावर सोडतात, त्यांच्यावर नगर परिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने नगर पालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी सुरज यादव, सौ. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौ. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

4 days ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
4 days ago

खामगावात मोकाट जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ​प्रशासनाने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा ​खामगाव : वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शहरातील गायी व इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच जनावरांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ होत असून शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाता' दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती बिकट आहे. तसेच, रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले प्लास्टिक खाल्यामुळे अनेक जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ​गौ तस्करी आणि बेजबाबदार मालकांवर कारवाईची मागणी अनेक पशुपालक आपली जनावरे दूध काढल्यानंतर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. या बेवारस परिस्थितीचा फायदा घेऊन शहरात गौ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी जे मालक जनावरे रस्त्यावर सोडतात, त्यांच्यावर नगर परिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने नगर पालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी सुरज यादव, सौ. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौ. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर.... देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल
    1
    बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर....
देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.
    1
    *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वडाळी हादरली! पोलिसांत तक्रार होऊनही चोर पुन्हा त्याच ठिकाणी परतले; ४ लाखांचे सोने लंपास.
    1
    वडाळी हादरली! पोलिसांत तक्रार होऊनही चोर पुन्हा त्याच ठिकाणी परतले; ४ लाखांचे सोने लंपास.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. ​जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ​पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. ​पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ​पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. ​जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ​पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. ​पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ​पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय
    1
    प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.