logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बियाणी नगर येथे २० लाखांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून हिंगोली शहरातील बियाणी नगर परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून येथील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिलचंद्र देशमुख, नगरसेवक उमेश गुठ्ठे, नगरसेवक रत्नाकर बांगर, श्रीनिवास कंठे, शंकर कंठे, मूंदडा, राजेश उत्रतवार, बन्सी सारस्वत, शिवा गुठ्ठे, राहुल बांगर, दर्शीत अग्रवाल, मुंढे ताई, अभिषेक देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

on 10 March
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
on 10 March
2c091988-0c5c-4523-9544-0e916b6f3c35

बियाणी नगर येथे २० लाखांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून हिंगोली शहरातील बियाणी नगर परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून येथील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. अनेक

bb5a9824-851e-492b-9f9b-9ae5e47f435f

दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिलचंद्र देशमुख, नगरसेवक उमेश गुठ्ठे, नगरसेवक रत्नाकर बांगर, श्रीनिवास कंठे, शंकर कंठे, मूंदडा, राजेश उत्रतवार, बन्सी सारस्वत, शिवा गुठ्ठे, राहुल बांगर, दर्शीत अग्रवाल, मुंढे ताई, अभिषेक देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. ​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. ​चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ​शेतकरी न्यायापासून वंचित ​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. ​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच?
या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली.
​चौकशी पत्रात अनियमितता
अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
​शेतकरी न्यायापासून वंचित
​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत.
​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
"महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल 
नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे.
दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.
नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    50 min ago
  • "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    1
    "नारी शक्ती वंदन" विधेयकाच्या समर्थनासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
“परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.