भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या ऐतिहासिक आणि एकत्रित आरक्षणात 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींच्या समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) रोजी 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महामोर्चातून शासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील भीम नगर येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रगीताचे गायन करून संपन्न झाला. या मोर्चामध्ये दीड हजारांहून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. आंदोलनकांच्या हातात संत शिरोमणी रविदास महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बैनर व पोस्टर होते. सर्व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून सोडले होते. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आज याच एकत्रित आरक्षणाला खिंडार पाडण्याचे आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचे प्रयत्न होत असल्याने ५८ जातींचे समाजबांधव आक्रमक झाले आहेत. संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ५८ जातींमधील हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन पाठवून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, शासनाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या विराट मोर्चात उत्तम नियोजन संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनिल बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, जगदिश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबुराम तायडे, राजु कवडकार, सुपा बांगर, अरुण पारवे, रामकृष्ण रजाने, गुलाबराव आठवले यांनी केले.

- जळणा जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातले वालसावंगी गावात असलेल्या मिनी आरोग्य केंद्राचा पहिल्याच पावसात पोलखोल झाला आहे. केंद्राच्या इमारतीची स्थिती खूपच खराब असल्याचे समोर आले आहे. पावसामुळे इमारतीचा एक भाग कोसळण्याची शक्यता असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. या केंद्राच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. रहिवाशांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. त्यांच्या मते, केंद्राच्या देखभालीवर पुरेसे लक्ष दिले जात नाही. यामुळे, नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करणे कठीण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना या समस्यांबाबत तत्पर लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, केंद्राची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.1
- वाशिम जिल्ह्यातून शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता आधार कार्डसह जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे खासदार देशमुख यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सीएससी केंद्रावर संपर्क साधून आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांनी आधार कार्डसह तत्काळ सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे.2
- एस आर मतदार यादीमध्ये सर्वांनी आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला आहे. याप्रश्नी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांनी अडकलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रसन्नजित पाटील यांनी सरकारवर टीका करत अखेर सरकारचा अहंकार मोडला आणि सरकार झुकले असल्याचे म्हटले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.1
- Post by Dipak Sonawal1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळेस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या बैठकीत सहभागी होऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करणे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे होता.1
- अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.1