Shuru
Apke Nagar Ki App…
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
Santosh Mane
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Dipak Sonawal1
- वाशिम जिल्ह्यातून शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता आधार कार्डसह जवळच्या सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे खासदार देशमुख यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सीएससी केंद्रावर संपर्क साधून आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांनी आधार कार्डसह तत्काळ सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केले आहे.2
- अकोला जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांच्या अंतर्गत मशागतीची म्हणजेच डवरणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. पिकांची योग्य वाढ व्हावी आणि तणाचा बंदोबस्त व्हावा यासाठी शेतकरी सकाळपासूनच शेतात राबत आहेत. पेरणीनंतर रोपे व्यवस्थित उगवून आली असून, ग्रामीण भागात शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने अथवा लहान ट्रॅक्टरच्या मदतीने डवरणीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. या डवरणीमुळे तण साफ होण्यासोबतच मातीची धूप रोखणे आणि पिकांच्या मुळांना हवा खेळती राहण्यास मदत होत आहे. दरम्यान, पेरणीनंतर सुरुवातीचा पाऊस ओसरल्याने आणि हवामानात उकाडा वाढल्याने पिकांच्या जोमदार वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. डवरणीची कामे आटोपत आली असली तरी पावसाने दिलेली उघडीप लांबल्यामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला असून लवकरच दमदार पाऊस कोसळेल अशी तीव्र आशा बाळगून आहे.1
- शेगाव येथील एन.व्ही. चिन्मयानंद विद्यालयात रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ, सोशल मीडियावरील दिशाभूल आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याविरोधात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे "व्यसनाला नाही, सुरक्षित भविष्यास होकार" असा ठाम संदेश देत विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाढते तस्करीचे जाळे आणि त्यामध्ये अडकलेल्या तरुणांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अवैध ड्रग्ज व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक बळ मिळत असल्याने हा विषय राष्ट्रीय सुरेशेशी जोडलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सोबतच OTP, बँकिंग माहिती, फिशिंग लिंक, QR कोड फसवणूक, बनावट मोबाईल अॅप्स, ऑनलाईन गेमिंग स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल अटक (Digital Arrest) आणि AI आधारित डीपफेक यांसारख्या नव्या सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यासाठी १९३०, तस्करीच्या संशयास्पद हालचालींसाठी १९३३ आणि व्यसनमुक्तीसाठी १४४४६ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव आणि पोलीस शिपाई ऋषिकेश जवळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, हेमलता मॅडम, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि राष्ट्रहित जपणाऱ्या जबाबदार नागरिक होण्याचा निर्धार व्यक्त केला असून रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या ऐतिहासिक आणि एकत्रित आरक्षणात 'अ, ब, क, ड' उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींच्या समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) रोजी 'अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या महामोर्चातून शासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील भीम नगर येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रगीताचे गायन करून संपन्न झाला. या मोर्चामध्ये दीड हजारांहून अधिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. आंदोलनकांच्या हातात संत शिरोमणी रविदास महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बैनर व पोस्टर होते. सर्व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून सोडले होते. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आज याच एकत्रित आरक्षणाला खिंडार पाडण्याचे आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचे प्रयत्न होत असल्याने ५८ जातींचे समाजबांधव आक्रमक झाले आहेत. संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ५८ जातींमधील हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सविस्तर निवेदन पाठवून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, शासनाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या विराट मोर्चात उत्तम नियोजन संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तम वानखडे, ज्ञानदेव इंगळे, सुनिल बोदडे, विजय तांदळे, शिवहरी रोजतकार, श्रीराम भिडे, विजय वानखडे, राहुल तायडे, सिद्धार्थ हेलोडे, संतोष वानखडे, रोशन तायडे, विजयकुमार तायडे, रतन नाईक, मंगल डोंगरदिवे, जगदिश हातेकर, प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, बाबुराम तायडे, राजु कवडकार, सुपा बांगर, अरुण पारवे, रामकृष्ण रजाने, गुलाबराव आठवले यांनी केले.1
- Post by Dipak Sonawal1
- अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.1