logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकास विरोध करणाऱ्या समाज कंठकावर कायदेशीर कारवाई करा.रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव राजेंद्र शेळके यांची मागणी! नांदेड:किनवट शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या आधुनिक डिजिटल नामफलकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेल्या या फलकाला काही स्थानिक व्यक्तींनी विरोध करत धमक्या दिल्याचा खळबळजनक आरोप जयंती समितीने केला आहे. याप्रकरणी आता नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. किनवट शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात' जयंती समितीचे अध्यक्ष आकाश आळणे आणि पदाधिकारी यांनी एक आधुनिक डिजिटल नामफलक लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी युवा उद्योजक आणि पत्रकार आशिष शेळके यांनी स्वखर्चाने हा फलक 'धम्मदान' म्हणून उपलब्ध करून दिला. मात्र, १४ एप्रिल या पवित्र दिवशी हा फलक उभारण्याचे काम सुरू असताना, विवेक ओंकार आणि मारोती मुनेश्वर नावाच्या व्यक्तींनी या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. "परवानगी घेतली नाही तर फलक उभारू देणार नाही" आणि "कायदेशीर कारवाई करू" अशा धमक्या देऊन या व्यक्तींनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याचे समितीने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, नगर परिषद कार्यालयात परवानगी मिळवतानाही काही कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याऐवजी टाळाटाळ केल्याने समितीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर स्थानिक आमदार भीमराव केराम यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाशी समन्वय साधून कायदेशीर रित्या हा फलक यशस्वीपणे उभारण्यात आला. सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणाऱ्या या कृत्याबद्दल किनवटमध्ये संताप व्यक्त होत असून, अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि या नामफलकास संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आता यावर नगर परिषद प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago
e59a86ff-de9c-44f1-97f5-af6ed4fcca25

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.”
यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Karan
    1
    Post by Karan
    user_Karan
    Karan
    Photographer कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    45 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.