logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नगराध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन नगराध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुढाकार सोनपेठ चौफेर (प्रतिनिधी) : हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय (कनिष्ठ व वरिष्ठ), सोनपेठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा सोनपेठ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. परमेश्वरराव राजाभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासोबतच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सोनपेठ शहरातील सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ या संदेशातून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘थेंब थेंब रक्ताचे, जीवन वाचवते’ हा मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, NSS विभागाचे अधिकारी व महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

58 min ago
user_पत्रकार साप्ताहिक सोनपेठ चौफेर
पत्रकार साप्ताहिक सोनपेठ चौफेर
Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
58 min ago

नगराध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन नगराध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुढाकार सोनपेठ चौफेर (प्रतिनिधी) : हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय (कनिष्ठ व वरिष्ठ), सोनपेठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा सोनपेठ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. परमेश्वरराव राजाभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासोबतच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सोनपेठ शहरातील सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ या संदेशातून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ‘थेंब थेंब रक्ताचे, जीवन वाचवते’ हा मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, NSS विभागाचे अधिकारी व महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    1
    सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन बीड | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    2
    कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या

शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांची नुकसानभरपाई द्या
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ‘हलगी बजाव’ आंदोलन
बीड | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. पावसाअभावी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” या प्रमुख मागणीसह गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने अदा करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हलगीच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक मदत जाहीर करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण 
बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.        
शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ
    1
    🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 
🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    1
    परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे
धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    4 hrs ago
  • जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    1
    जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत सोनपेठ (दर्शन) :- मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    1
    मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत  
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत   
सोनपेठ (दर्शन) :- 
मराठी जुने गाणे अफलातून "शुक्रतारा मंदवारा" मराठी गितकार, संगितकार, गायक व गायीका पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटणारच मराठी गीत, आजच्या नव्या पिढिला मराठी जुणे गाणे नकोसे वाटतात तेच जुण्या पिढिला जुण्या आठवणीत घेऊन जातात.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    1
    “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
“ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा केज | प्रतिनिधी केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    4
    देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा

देवगाव ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी श्री. पोटभरे यांच्यासह संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाची विशेष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी दि. ७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मा. श्री. चौरे ए.बी. व श्री. हतागळे एस.डी. यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी देवगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या चौकशीदरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे न करता सुमारे २ लाख रुपयांची रक्कम कथितरित्या उचलल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या चौकशीचा अहवाल दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, केज यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधितांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या सर्व कामांची कामनिहाय खर्चासह सखोल चौकशी व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, बीड येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या प्रकरणी प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवालाच्या आधारे पुढील काय कारवाई केली जाते, याकडे देवगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.