logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव: नगरपरिषदेच्या 'नाना-नानी' पार्कमध्ये प्रवेश शुल्कावरून वाद; नागरिकांमध्ये संताप! ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

1 hr ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

खामगाव: नगरपरिषदेच्या 'नाना-नानी' पार्कमध्ये प्रवेश शुल्कावरून वाद; नागरिकांमध्ये संताप! ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

More news from Washim and nearby areas
  • कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    2
    कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    8 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Physiotherapist सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    1
    तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    58 min ago
  • मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    4
    मेडशी :-
अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला  गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न  करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • घनसावंगी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती केंद्र गुंज बु. येथे इयत्ता पहिली वर्गाचा शाळा प्रवेशोत्सव मेळावा दि. 29 एप्रिल 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रवेशपात्र मुलांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पाऊलांचे ठसे घेऊन जतन करण्यात आले आहेत. या पूर्वतयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीसाठी 20 मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी ताई, शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, माता पालक व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. दि. 1 मे 2026 रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मुलांच्या कलागुणांचा अविष्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..
    1
    घनसावंगी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती केंद्र गुंज बु. येथे इयत्ता पहिली वर्गाचा शाळा प्रवेशोत्सव मेळावा दि. 29 एप्रिल 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. 
प्रवेशपात्र मुलांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध स्टॉल लावण्यात आले होते. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या पहिल्या पाऊलांचे ठसे घेऊन जतन करण्यात आले आहेत. या पूर्वतयारी मेळाव्यात  इयत्ता पहिलीसाठी 20  मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक तौर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदांनी   यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी ताई, शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक, माता पालक व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. 
दि. 1 मे 2026 रोजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन (गॅदरिंग) मुलांच्या कलागुणांचा अविष्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 min ago
  • कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    2
    कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    8 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Physiotherapist सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    1
    "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी 
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे.
मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    38 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.