राजनंदिनी पडर हिचा जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे हस्ते सत्कार जावलीची राजनंदिनी पडर हिचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल सातारा जि.प. अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दरवर्षी हा दिवस ७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी (आंदरूड) केंद्र जावली ता. फलटण येथील इ. ४ थीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक महान विचारवंत या विषयावर बोलताना अत्यंत ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत तिने हे यश संपादन केले आहे. कु. राजनंदिनी हि उत्तम वक्ता असून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर बोलताना अनेक शासकीय व खाजगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कु. राजनंदिनी हिने आक्रमक शैलीत मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डाॅ. प्रियांका महेश शिंदे, उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, शिक्षण सभापती सौ.तेजस्विनी विक्रम कदम, कृषी सभापती सौ. लता कर्णे , समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील,सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, निलेश घुले साहेब,सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक)अनिस नायकवडी,शिक्षणाधिकारी माध्यमिक धनंजय चोपडे, शबनम मुजावर, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांच्यासह सर्व अधिकारी पदाधिकारी व अधिकारी, शिक्षकयांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला यावेळी तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

- ##1
- Post by मन्सूर शेख1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक सातारा, दि. २० सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.4
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.1