पावसाळ्यात आपत्तीचा सामना करताना योग्य समन्वय ठेवा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आपत्ती काळात तात्काळ मदत करण्याच्या सूचना विजेपासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप डाऊनलोड करण्याचे. आवाहन परभणी, (प्रतिनिधी) : आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. तसेच आपत्ती काळात मदत व पुनर्वसन कार्य तात्काळ सुरू करून नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महापौर सय्यद इकबाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथकांची तयारी, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण भागातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा, मासोळी तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांमुळे काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरप्रवण गावांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक साहित्यांची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात जलजन्य आजारांवरील उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावेत. औषधसाठा, रक्तसाठा आणि अन्य आवश्यक साहित्य मुबलक प्रमाणात ठेवण्यासोबतच साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. ब्लिचिंग पावडरचा सुरक्षित वापर व साठवणुकीवरही भर देण्यात आला. बैठकीत एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाच्या अनिश्चिततेबाबत माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी विजेपासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी बदलत्या हवामान परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. तालुकास्तरावरही संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांनी, विशेषतः शेतकरी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दामिनी ॲपसह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मोबाईल ॲप डाऊनलोड करून सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले. धरणांची दुरुस्ती, पूररेषा क्षेत्रातील बांधकामांवर नियंत्रण, शहरातील नाल्यांची स्वच्छता तसेच धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी सुरक्षित स्थळांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन आणि कृषि विभागांनीही आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नदीपात्रातील पाणीपातळी व धोक्याच्या इशारा पातळीबाबत सर्व विभागांशी समन्वय ठेवावा, असे सांगण्यात आले. नगरपालिका प्रशासनाला शहरातील नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सादरीकरणाद्वारे विभागनिहाय कार्यवाहीची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी आभार मानले.

- “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर1
- गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.2
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मनथा येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ११ दिवस पूर्ण झाले. आंदोलकांनी पत्रांचा 'तमाशा' होऊनही प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.1