खंडोबा माळ येथील टोइंग कारवाई थांबवण्याची 'आप'ची मागणी पिंपरी, दि. 30 जुलै : खंडोबा माळ चौक ते दळवी नगर उड्डाणपूल (गणेश व्हिजनसमोरील) परिसरातील वाहनांवरील टोइंग कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित ठिकाणी पूर्वी महापालिकेने पे अँड पार्कसाठी पांढरे पट्टे मारले होते. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर ही योजना राबविण्यात आली नाही. सध्या त्या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असून वाहतुकीची कोंडीही होत नाही. तरीही वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅनद्वारे वाहनांवर कारवाई केली जात असल्याने नागरिक, व्यापारी आणि सोसायटीधारकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी सांगितले. यावेळी संघटन मंत्री अजय सिंग यांनी भुमकर चौक ते लक्ष्मी चौक, हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्येकडे लक्ष वेधले. तसेच युवा उपाध्यक्ष विजय चांडल यांनी देहू येथील परंडवाल चौकातील वाहतूक समस्येचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, संघटन मंत्री अजय सिंग, कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, महिला आघाडीच्या शिल्पा फुलमाळी, युवा उपाध्यक्ष विजय चांडल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

- घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.2
- वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी1
- "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"1
- Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- "खरं हाय ते मी सांगतोय..., सत्य सांगा पण बिनधास्त सांगा..!"1
- उलटहिंजवडीमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई दरम्यान क्रेन दुकानावर उलटली, कोणतीही जीवितहानी झाली नाही पुण्यातील हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात ३१ जुलै २०२६ रोजी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची (PMRDA) महाकाय क्रेन अचानक एका दुकानावर उलटली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #Hinjewadi #PuneNews #HinjawadiAccident #PMRDA #HinjewadiLaxmiChowk #PuneAccident #HinjewadiNews #BreakingNewsPune #HinjawadiHoardingCrash1