घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या
वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.
- शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. उघडकीस आलेले ६ गुन्हे शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६ धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६ मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६ सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६ सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.1
- ससंद भवन परिसरात खा पप्पू यादव यांनी सकाराला प्रतिकात्मक चोरीचा आणि लुटीचा जिवंत देखावा लोकमान्य टाइम्स श्रद्धेच्या मंदिराचा चोरी आणि लुटीसाठी झालेला वापर जगाला कळावा यासाठी या चोरी आणि लुटीचा जिवंत देखावा लोकशाहीच्या मंदिरापुढं INDIA आघाडीच्या खासदारांनी सादर केला. खासदार पप्पू यादव यांनी भगवी कपडे परिधान करुन मंदिरातील दान पेटीची प्रतिकृती तयार करुन संसद भवन परिसरात पूजऱ्यांच्या वेषात बसले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदार यांनी या दान पेटीत दान टाकण्यास सुरुवात केल्यावर पुजाऱ्याची भूमिका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांनी ते दान हिसकावून घेण्याचा ड्रामा केला. करीत श्री राम मंदिरात दान पेटी तील चोरीचा निषेध केला. बघून तरी सत्ताधारी श्रद्धेचा राजकीय बाजार मांडणार नाहीत आणि श्रद्धेच्या मंदिरात चोरी2
- नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत1
- “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”1
- खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.1
- सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. राजरोस वृक्ष तोंड, उत्खनन करून माती,मूर्माचे विक्री, किती रोप आणली किती लागवड व वृक्ष जतन झाले का? कोट्यवधी पैसा व निधी हडप. माती ,मुरुमाची रॉयल्टी भरले का? सिन्नर फॉरेस्ट कार्यालयात भयंकर भ्रष्टाचार? अवैध वृक्ष तोड -- ------------------ सिन्नर तालुक्यातील वनक्षेत्रात दररोज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहेत. अधिकारी दुर्लक्ष करतात याआडून भ्रष्टाचार चालू आहेत. माती व मुरुमाची बेकायदेशीर उत्खनन व विक्री --- ---------------------------------++ वनजमिनींतून अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले आहेत. रॉयल्टी चुकवून यात अधिकारी कर्मचारी यांनी टेबलाखालून वरून पैसा कमावत भ्रष्टाचार केला आहेत. आज पर्यंत वनक्षेत्र जमिनीत उत्खनन किती झाले? किती रॉयल्टी भरली? किती पैसा कुणीकुणी हडपला याची चौकशी व्हावी. मलिदा चाखायचाय मिळतोय यामुळे वारेमाप उत्खनन होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत. वृक्ष रोप व वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार - --------------------------------- आजपर्यंत रोप खरेदी किती खर्च प्रत्यक्षात किती रोप खरेदी? लागवड किती केली? वृक्ष जतन खर्च किती? वृक्ष जगली किती? जंगल कुठे वाढवली? यासाठी निधी किती आला? हा कोट्यवधी निधी कुठे खर्च केला! याचा रिझल्ट म्हणजे जंगल, झाडे कुठे? हिशोब द्यावा. म्हणून काही रानात वणवा पेटला की झाकण्यासाठी पेटविला? रान पेटवत कोण? हेतू काय? अनेक जंगल राखण करण्यासाठी त्या भागातील साधाभोळा शेतकरी कर्मचारी नेमायाचा. त्याचा पगार न देता हडप करायचा. पैसे झिरवण्यासाठी त्याला वर्ष दोन वापरून कामावरून कमी करायचे.याची चौकशी करून कारवाई करावी. वृक्ष लागवड व जतन योजनेत कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार झाला आहेत. कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी. वरील मागण्यासाठी व या भ्रष्टाचार विरोधात शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर वतीने आमरण उपोषण करण्यात येणार. - शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर मो.९६८९३५०६२२.1
- पुण्यात खळबळ! भिडे पुलाजवळ मुठा नदीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; डेक्कन पोलिसांचा तपास सुरू1