logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रातर्फे आदर्श व गुणवंत शिक्षकांचा गौरव; तीर्थपुरीचे गोविंद डोंगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रातर्फे आदर्श व गुणवंत शिक्षकांचा गौरव; तीर्थपुरीचे गोविंद डोंगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घनसावंगी प्रतिनिधी दृष्टिहीनतेवर मात करून सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राच्यावतीने आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील विविध सामान्य शाळांमध्ये कार्यरत असलेल्या गुणवंत दृष्टिहीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र ही संस्था गेल्या ५० वर्षांपासून अंध व दृष्टिहीन व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. आळंदी येथील जागृती अंध कन्या विद्यालय, नाशिक येथील कैलासवासी प्रा. रकिबे ट्रेनिंग सेंटर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील अंध मुलींची कार्यशाळा यांसह विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. शिक्षकांची निवड त्यांच्या शैक्षणिक कार्याची गुणवत्ता, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि समाजासाठी दिलेले योगदान या निकषांच्या आधारे करण्यात येते. यावर्षी तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक गोविंद काशिनाथ डोंगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. “दृष्टिहीन असलो तरी ज्ञानदान थांबविले नाही” — गोविंद डोंगरे आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना गोविंद डोंगरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी दृष्टिहीन असलो तरी सामान्य मुलांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविणे, हेच माझ्यासाठी समाधानाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

1 day ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
1 day ago
4f4e0557-195b-4465-b8af-0c86e896a2dd

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रभाग १० मध्ये नाल्यावर जंतुनाशक फवारणी सुरू; नगरसेवकांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल!.. शेख अनिस मित्र मंडळाच्या मागणीची आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली तात्काळ दखल; ‘जे काम नगरसेवकांनी करायचे, ते सामाजिक कार्यकर्त्यांना का करावे लागते?’ प्रभाग १० मध्ये नाल्यावर जंतुनाशक फवारणी सुरू; नगरसेवकांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल!.. शेख अनिस मित्र मंडळाच्या मागणीची आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली तात्काळ दखल; ‘जे काम नगरसेवकांनी करायचे, ते सामाजिक कार्यकर्त्यांना का करावे लागते?’ आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : प्रभाग क्रमांक १० मधील माळीपुरा परिसरातील नाल्यांमध्ये घाण, दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेख अनिस मित्र मंडळाच्या वतीने नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी तात्काळ दखल घेत स्वच्छता विभागाला आवश्यक आदेश दिले. त्यानंतर आज माळीपुरा परिसरातील नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली.
    1
    प्रभाग १० मध्ये नाल्यावर जंतुनाशक फवारणी सुरू; नगरसेवकांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल!..

शेख अनिस मित्र मंडळाच्या मागणीची आयुक्त अंजली शर्मा यांनी घेतली तात्काळ दखल; ‘जे काम नगरसेवकांनी करायचे, ते सामाजिक कार्यकर्त्यांना का करावे लागते?’

आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : प्रभाग क्रमांक १० मधील माळीपुरा परिसरातील नाल्यांमध्ये घाण, दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेख अनिस मित्र मंडळाच्या वतीने नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी तात्काळ दखल घेत स्वच्छता विभागाला आवश्यक आदेश दिले. त्यानंतर आज माळीपुरा परिसरातील नाल्यावर जंतुनाशक फवारणी आणि नाल्याची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    28 min ago
  • नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    1
    नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..

डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..
डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    1
    मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    1
    17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया.
17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
    1
    मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली.  पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.  दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    37 min ago
  • जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
    1
    जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!

चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप

    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    1
    जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!..

चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?..

चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल..
चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?..
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    41 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.