माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल ! तीन ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर अहिल्यानगर, दि.१८ :- ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत. या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. याशिवाय विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती अहिल्यानगर व राहाता, तर जिल्हास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती संगमनेर यांना प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज करण्यात आले. तसेच २०२५-२६ मधील क्षेत्रीय पाहणी व मूल्यांकन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली झाल्यामुळे राज्याच्या व विभागाच्या यादीत जिल्ह्याला ही मोठी संधी मिळाली आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी बक्षीसाच्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढवण्यासाठी व उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी खर्च करावयाची आहे. या ग्रामपंचायतींनी भूमी, वायू, अग्नी, जल व आकाश या घटकांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. भूमी घटकांतर्गत देशी प्रजातींच्या झाडांची लागवड, जुन्या झाडांचे संगोपन, रोपवाटिका निर्मिती, कचरा संकलन व प्रक्रिया, तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. गावे हागणदारीमुक्त करून मॉडेल गावे तयार करण्यात आली. वायू घटकात हवेची गुणवत्ता तपासणी, फटाके बंदी, सायकल ट्रॅकची निर्मिती व विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले. जल घटकांतर्गत पाणी पातळी वाढवणे, जलस्त्रोतांची स्वच्छता, सार्वजनिक इमारतींचे जल लेखापरीक्षण (वॉटर ऑडिट), पर्जन्य जल संधारण व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम जलकुंडांची निर्मिती करण्यात आली. अग्नी घटकांतर्गत गावांमध्ये सौर दिवे, एल.ई.डी. पथदिवे लावणे व घरांवर तसेच शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. सार्वजनिक इमारतींचे ऊर्जा लेखापरीक्षण करून विद्युत बचतीवर भर देण्यात आला. आकाश घटकामध्ये अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी माहिती, शिक्षण व संवाद आराखडा तयार करून स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ देऊन पर्यावरण दूत म्हणून सहभागी करून घेण्यात आले. भिंतींवर पंचतत्त्वांची चित्रे काढून जनजागृती करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना एकूण २० कोटी ६५ लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत. पुढील माझी वसुंधरा अभियान ६.० (२०२५-२६) मध्येही पुरस्कार जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी स्पष्ट केले आहे. हे यश मिळवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नोडल अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा समन्वयक रविंद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर व सरपंचांचे मोठे योगदान लाभले आहे. #MajhiVasundhara #EnvironmentConservation #AhilyanagarZP #NashikDivision #SustainableDevelopment #GreenVillage #Panchtatva #EcoFriendly #माझीवसुंधरा #अहिल्यानगर #पर्यावरण #ग्रामपंचायत #पुरस्कार

- गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवात त्यांचे बालरूप असलेला पाळणा झुलवला, याप्रसंगी जिजाऊंच्या लेकींनी मायेने पाळणा गायला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.1
- शिक्षा सस्ता करने की मांग1
- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- दर वर्षि प्रमाने या वर्षी पण शिव जयती साजरी करण्यात आली आहे श्री गजानन विद्या मदिर या शाळेच्या मुलानि शिव जंयति साजरी केली आहे1
- तलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी1
- सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली1
- (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.1
- हिंद दी चादर गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने अहिल्यानगर येथील गुरूद्वारा भाई दया सिंगजी येथे २२ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य शिबिर1