logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ! (काँग्रेसचे निवेदन ; वाळलेले सोयाबीन एसडीओंच्या हातात दिले) उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी प्रमुख मागणी करीत, शेतकऱ्यांना खरीप पिक सोयाबीन हेक्टरी 2 लाख मदत, ऊस व हळद उत्पादकांना हेक्टरी २ लाख रुपये शासनाने विशेष मदत करावी. तसेच गतवर्षीचा पिक विमा तातडीने मंजूर करावा, अशा विविध मागण्यासाठी, शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने, वाळलेल्या सोयाबीनची झाडे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत, उपविभागीय अधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. उमरखेड तालुक्यात यावर्षी पावसाचे अत्यल्प व अनियमित प्रमाण, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठा उत्पादन खर्च करून उभी केलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुपालकांना तातडीने विशेष आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व उमरखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी २ लाख मदत द्यावी. तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई व पीक नुकसानीची पाहणी करून, उमरखेड तालुका तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा. तसेच खरीप नुकसानग्रस्त सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख आर्थिक मदत देण्यात यावी, ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख विशेष मदत द्यावी. ऊस व हळद या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च केलेला आहे. मात्र पाण्याअभावी व प्रतिकूल हवामानामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख विशेष आर्थिक मदत देण्यात यावी. इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे , अरविंद वाढोणकर , संजय मोघे, महेंद्र कावळे यांच्यासह तातू देशमुख , नंदकिशोर अग्रवाल , महेन्द्र कावळे , दत्तराव शिंदे , गोपाल अग्रवाल , ख्वाजाभाई कुरेशी , बाळासाहेब चंद्रे , गणेश बेले, धोंडबा माने , उत्तम पांडे, अनिल कदम, गजानन भारती, कैलास राऊत, तात्या चव्हाण, गजानन मिटकरे, अमोल तुपेकर, जाहीर काजी, हमीद काजी, युवराज जाधव यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .

16 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
16 hrs ago
c79d0edf-0222-436e-8eb1-911ef2df96c5

उमरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ! (काँग्रेसचे निवेदन ; वाळलेले सोयाबीन एसडीओंच्या हातात दिले) उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी प्रमुख मागणी करीत, शेतकऱ्यांना खरीप पिक सोयाबीन हेक्टरी 2 लाख मदत, ऊस व हळद उत्पादकांना हेक्टरी २ लाख रुपये शासनाने विशेष मदत करावी. तसेच गतवर्षीचा पिक विमा तातडीने मंजूर करावा, अशा विविध मागण्यासाठी, शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने, वाळलेल्या सोयाबीनची झाडे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत, उपविभागीय अधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. उमरखेड तालुक्यात यावर्षी पावसाचे अत्यल्प व अनियमित प्रमाण, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठा उत्पादन खर्च करून उभी केलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुपालकांना तातडीने विशेष आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व उमरखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी २ लाख मदत द्यावी. तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई व पीक नुकसानीची पाहणी करून, उमरखेड तालुका तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा. तसेच खरीप नुकसानग्रस्त सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख आर्थिक मदत देण्यात यावी, ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख विशेष मदत द्यावी. ऊस व हळद या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च केलेला आहे. मात्र पाण्याअभावी व प्रतिकूल हवामानामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख विशेष आर्थिक मदत देण्यात यावी. इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे , अरविंद वाढोणकर , संजय मोघे, महेंद्र कावळे यांच्यासह तातू देशमुख , नंदकिशोर अग्रवाल , महेन्द्र कावळे , दत्तराव शिंदे , गोपाल अग्रवाल , ख्वाजाभाई कुरेशी , बाळासाहेब चंद्रे , गणेश बेले, धोंडबा माने , उत्तम पांडे, अनिल कदम, गजानन भारती, कैलास राऊत, तात्या चव्हाण, गजानन मिटकरे, अमोल तुपेकर, जाहीर काजी, हमीद काजी, युवराज जाधव यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    1
    पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
"कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!"
— लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    1
    पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री  नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    1
    फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    3
    एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार
एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    8 min ago
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ (दर्शन) :- प्रति, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई -32. विषय :- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. महोदय उपरोक्त विषयी मी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले, सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पंचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण ७ वाजून ४० मिनिटांनी होता परंतु सभापती ७ वाजून ४५ मिनिटांनी उपस्थित झाल्या, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले, सभापती निकिता विकास मुजमुले यांच्यावर योग्य ती सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन करत आहे. सोबत त्यांचा कारचा व्हिडिओ त्या ७:४५ ला आल्या स्विफ्ट डिझायर एम.एच. ४५ ए डी ३०७९ या क्रमाकांच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये सभापती शाळेमध्ये आल्या व निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे. धन्यवाद आपला विश्वासू संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन मो.९८२३५४७७५५२
    3
    सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.

सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.
सोनपेठ (दर्शन) :- 
प्रति, 
मुख्यमंत्री 
महाराष्ट्र शासन
मंत्रालय मुंबई -32.
विषय :- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.
महोदय 
उपरोक्त विषयी मी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले, सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पंचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण ७ वाजून ४० मिनिटांनी होता परंतु सभापती ७ वाजून ४५ मिनिटांनी उपस्थित झाल्या, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले, सभापती निकिता विकास मुजमुले यांच्यावर योग्य ती सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन करत आहे. सोबत त्यांचा कारचा व्हिडिओ त्या ७:४५ ला आल्या स्विफ्ट डिझायर एम.एच. ४५ ए डी ३०७९ या क्रमाकांच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये सभापती शाळेमध्ये आल्या व निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे.
धन्यवाद 
आपला विश्वासू 
संपादक किरण रमेश स्वामी 
साप्ताहिक सोनपेठ दर्शन 
मो.९८२३५४७७५५२
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    1
    अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
    1
    वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले
*ब्रेकिंग न्यूज - वर्धा*
*वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले*
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने  अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला.
बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63
व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे  यांनी केली आहे .
जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे
या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे
गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले.
सदर कारवाई
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.