logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थीही गिरवू लागले कर्मवीरांच्या संस्कारांचे धडे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे संस्कार व दलितमित्र दादा पाटील यांची त्यास मिळालेली भक्कम साथ यातून उभे राहिलेले दादा पाटील महाविद्यालय आज चांगलेच नावारूपाला आले आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सांस्कृतिक ,शैक्षणिक मूल्ये जोपासली जात आहेत.कर्मवीरांची स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य तसेच त्याग आणि समर्पण ही मूल्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये रुजावी म्हणून महाविद्यालयात गेली चार वर्षे ' माझा वाढदिवस माझे पुस्तक ' हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. त्या माध्यमातून आजपर्यंत ग्रंथालयात 411एवढी वाचनीय पुस्तके जमा झाली आहेत. तसेच आई किंवा वडिलांचे छत्र नसलेल्या व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ' गरीब विद्यार्थी - विद्यार्थिनी फंड ' उभा केला जात आहे. कुटुंबात कोणाचा वाढदिवस, विवाह, वास्तुशांती, सेवापूर्ती किंवा काही आनंददायक प्रसंग घडला तर स्वखुषीने काही एक रक्कम या निधीसाठी देण्याचे आवाहन केले जाते. त्या माध्यमातून आजपर्यंत १९ लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली असून, त्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग गरजू विद्यार्थांसाठी केला जातो. तसेच दरवर्षी काकडे कलेक्शन यांच्या माध्यमातून ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. विद्यार्थी स्वावलंबी व्हावा यासाठी महाविद्यालय विकास समितीने व सर्व सन्माननीय सदस्यांनी दरवर्षी रु. ३ लाख रक्कम ' कमवा व शिका योजने' साठी मंजूर केली असून, कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे. सामाजिक व आर्थिक दुर्बल घटक आणि गुणवंत विद्यार्थांसाठी शासकीय व इतरही शिष्यवृत्त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावी यासाठी महाविद्यालयात ' समान संधी केंद्र ' स्थापन केले आहे. त्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेची बॅरिस्टर पी जी. पाटील शिष्यवृत्ती, गणित विषयाची शिष्यवृत्ती या रुपये १,५०,००० रुपयांच्या इतर शिष्यवृत्त्या दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. (आजपर्यंत रु.४ लाख पन्नास हजार प्रदान) याच बरोबर संशोधन, पेटंट, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय निवड झालेल्या खेळाडूस प्रोत्साहनपर रु.५१ हजार दिले जातात. ( आजपर्यंत रू.१ लाख ५३ हजार रु.) विद्यापीठ विद्यार्थी विमा योजने अंतर्गत अपघात झाल्यास रु. १ लाख मदत मिळते.या योजनेंतर्गत ३ विद्यार्थ्याच्या पालकांना रु.३ लाख या योजनेचा फायदा मिळाला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये महाविद्यालयाविषयी विश्वास व आस्था निर्माण होण्यास व या सर्वांचा परिपाक म्हणजे आता रयत सेवक,पालकांबरोबरच विद्यार्थीही त्याग व समर्पणाचे धडे गिरवू लागले आहेत. त्याचे प्रत्यंतर नुकतेच आले.वाढदिवसाच्या निमित्ताने कु. संस्कृती तुळशीदास घुमरे या विद्यार्थिनीने ७०००/- व यशराज सुनील क्षीरसागर या विद्यार्थ्याने रु.२१००/- गरीब विद्यार्थी फंडासाठी प्रदान केले. याप्रसंगी पालक संघाचे अध्यक्ष राहुल नवले, पालक श्री. सुनील क्षीरसागर, प्रा. तुळशीदास घुमरे यांना त्यांच्या पाल्यांसह पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. राहुल नवले यांनी या सर्व उपक्रमांचे कौतुक करताना इतर पालक व सक्षम विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमात समाविष्ट करणे बाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच " विद्यार्थी - पालक - नागरिक व सेवकांनी विविध कौटुंबिक कार्यक्रम प्रसंगी अनावश्यक खर्च टाळून महाविद्यालयाने निर्माण केलेला एक आगळावेगळा आदर्श घ्यावा असे आव्हान याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले." याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

2 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
2 hrs ago
5bc52e2c-931e-4e0e-bd14-289243c32663

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    1
    BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    ___
जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • माननीय पोलीस अधीक्षक आंटी करप्शन ब्युरो संभाजीनगर येथे सुद्धा तक्रार दाखल आहे परंतु ही सुद्धा तक्रार दाबल्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या मुंबई कार्यालाला याप्रकरणी माहिती देण्यात आली असून पाचोड पोलीस स्टेशनचे चार अधिकारी त्वरित सस्पेंड करा व सीबीआय चौकशी करा असे या ठिकाणी बरेच प्रकरण दाबलेले आहेत या पाठीमागे जो प्रकरण दाबतो त्याचे नाव समोर आणा त्याची मी कुंडली ओपन करतो सध्या रनिंग प्रकरण दाबणाऱ्या अधिकारी किशोर शिंदे जमादार वडजी बीट विमा मांडा चौकी नंबर दोन रामबा राहते पोलीस उपनिरीक्षक सध्या पाचोड पोलीस स्टेशन आणि महत्वाचे म्हटले तर सिनिअर ऑफिसर ने या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या कुणाच्या आणि यांनी प्रकरण निकाली काढले कसे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सिन्नर ऑफिसर एपीआय सचिन पंडित यांच्या स्वाक्षरी शिवाय दिलेल्या पत्रावर कारवाई करण्याऐवजी खोटे अहवाल यांनी सर्वांनी मिळून वरिष्ठांना पाठवले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांना याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांनी सहमत दर्शवून गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचवण्यास मदत केली त्यामुळे खालील कलम अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा #पोलीसानी प्रकरण दाबण्याचा किंवा तपासात करण्यात हलगर्जीपणा (Police Inaction/Suppression) केल्यास, संबंधित #अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६६, IPC कलम १६७, १७७ किंवा २१७-२२१ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच, भ्रष्टाचाराचा संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते -------------------------------------------------------------------- पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन पंडित साहेब तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु आपल्या पोलीस स्टेशनला माझे पेंटिंग अर्ज पोलीस उपनिरीक्षक रामबाहते वडजी गावची जमादार किशोर शिंदे यांनी गेली 2021 पासून माझे गंभीर प्रकरण दाबले आहे संपादक सुभाष मस्के पैठण न्युज ऑनलाईन संपादक पत्रकार असोसिएशन प्रेस मीडिया मेंबर संपर्क 8830106773
    1
    माननीय पोलीस अधीक्षक आंटी करप्शन ब्युरो संभाजीनगर येथे सुद्धा तक्रार दाखल आहे परंतु ही सुद्धा तक्रार दाबल्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या मुंबई कार्यालाला याप्रकरणी माहिती देण्यात आली असून पाचोड पोलीस स्टेशनचे चार अधिकारी त्वरित सस्पेंड करा व सीबीआय चौकशी करा असे या ठिकाणी बरेच प्रकरण दाबलेले आहेत या पाठीमागे जो प्रकरण दाबतो त्याचे नाव समोर आणा त्याची मी कुंडली ओपन करतो सध्या रनिंग प्रकरण दाबणाऱ्या अधिकारी किशोर शिंदे जमादार वडजी बीट विमा मांडा चौकी नंबर दोन रामबा राहते पोलीस उपनिरीक्षक सध्या पाचोड पोलीस स्टेशन 
आणि महत्वाचे म्हटले तर सिनिअर ऑफिसर ने या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या कुणाच्या आणि यांनी प्रकरण निकाली काढले कसे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सिन्नर ऑफिसर एपीआय सचिन पंडित यांच्या स्वाक्षरी शिवाय दिलेल्या पत्रावर कारवाई करण्याऐवजी खोटे अहवाल यांनी सर्वांनी मिळून वरिष्ठांना पाठवले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांना याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांनी सहमत दर्शवून गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचवण्यास मदत केली 
त्यामुळे खालील कलम अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा
#पोलीसानी प्रकरण दाबण्याचा किंवा तपासात करण्यात हलगर्जीपणा (Police Inaction/Suppression) केल्यास, संबंधित #अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६६, IPC कलम १६७, १७७ किंवा २१७-२२१ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच, भ्रष्टाचाराचा संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत  अधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते 
--------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन पंडित साहेब तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु आपल्या पोलीस स्टेशनला माझे पेंटिंग अर्ज पोलीस उपनिरीक्षक रामबाहते वडजी गावची जमादार किशोर शिंदे यांनी गेली 2021 पासून माझे गंभीर प्रकरण दाबले आहे
संपादक सुभाष मस्के 
पैठण न्युज ऑनलाईन 
संपादक
पत्रकार असोसिएशन प्रेस मीडिया 
मेंबर संपर्क 8830106773
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    1
    पिंपरी चिंचवड : - 
जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय....
: प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता
: स्थानिक महिला
: विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी
#हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण
#Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.