राज्य शासनाकडून दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावातील दोन कर्तबगार महिलांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. ९ मे २०२३ च्या शासकीय निर्णयानुसार हा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेणे बंधनकारक आहे. मात्र यंदा वाशिम जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा असून, पुरस्कार वितरण प्रत्यक्षात झाले की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती स्तरावरून सर्व ग्रामपंचायतींना हा कार्यक्रम आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे निर्देशही दिले होते. असे असतानाही अनेक ठिकाणी कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली याबाबत शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी काढण्यात आलेली जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे, उपस्थिती नोंद आणि कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. जीपीएसयुक्त छायाचित्रांमुळे कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष झाला असल्याची खात्री होईल आणि खोटी माहिती किंवा कागदोपत्री कार्यक्रम दाखवण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने सुरू केलेला हा पुरस्कार केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींकडून कार्यक्रमाचे पुरावे मागवून त्याची शहानिशा करावी, तसेच ज्या ग्रामपंचायतींनी कार्यक्रम घेतला नाही किंवा चुकीची माहिती सादर केली असेल, त्या संबंधित ग्रामसेवक, सरपंच व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण, लोककल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ सुरू झालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देणारा असल्याने, या योजनेची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे गरजेचे असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
राज्य शासनाकडून दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावातील दोन कर्तबगार महिलांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. ९ मे २०२३ च्या शासकीय निर्णयानुसार हा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेणे बंधनकारक आहे. मात्र यंदा वाशिम जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा असून, पुरस्कार वितरण प्रत्यक्षात झाले की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती स्तरावरून सर्व ग्रामपंचायतींना हा कार्यक्रम आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे निर्देशही दिले होते. असे असतानाही अनेक ठिकाणी कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली याबाबत शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी काढण्यात आलेली जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे, उपस्थिती नोंद आणि कार्यक्रमाचा सविस्तर
अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणे अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे. जीपीएसयुक्त छायाचित्रांमुळे कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष झाला असल्याची खात्री होईल आणि खोटी माहिती किंवा कागदोपत्री कार्यक्रम दाखवण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने सुरू केलेला हा पुरस्कार केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींकडून कार्यक्रमाचे पुरावे मागवून त्याची शहानिशा करावी, तसेच ज्या ग्रामपंचायतींनी कार्यक्रम घेतला नाही किंवा चुकीची माहिती सादर केली असेल, त्या संबंधित ग्रामसेवक, सरपंच व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण, लोककल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ सुरू झालेला हा पुरस्कार ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देणारा असल्याने, या योजनेची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे गरजेचे असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
- माहूर शहर आणि तालुक्यात लोकमाता, न्यायप्रिय तसेच जनकल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकासह श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथेही जयंतीचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांची न्यायव्यवस्था, महिला सक्षमीकरणातील योगदान आणि धर्मकार्यातील विचार तसेच लोककल्याणकारी दृष्टिकोन यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, ॲड. रमण जायभाये, नीलकंठ मस्के, डॉ. निरंजन केशवे, संजय भाऊ राठोड, ज्ञानेश्वर लाड, गोपू महामुने, अविनाश भोयर, सौ. राधा उपलेचवार, राजू सौंदलकर, विलास गावंडे, तानाजी मनभे, अनिल वाघमारे, विनोद सूर्यवंशी, नंदकुमार जोशी सर, इलियास बावाणी, योगेश परसवाळे, पुरुषोत्तम लांडगे, कैलास महल्ले, संतोष महल्ले, सौ. स्वाती आडे, रामकृष्ण केंद्रे, कैलास फड, पवन पांढरे, नवल वानखेडे, बळीराम डुरके, संतोष गंधे, संजय गुरनुले, परमेश्वर कानडे, आनंद हिंगाडे, संतोष हिंगाडे, बालाजी गेंटलवार, लव गावंडे आणि दत्तकृपा प्रतिष्ठानचे विजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, तालुक्यातील मनीरामथड येथे पिंटू पाटील वायफनीकर यांच्यासह अन्य मान्यवरांनीही अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली.2
- चांदूर रेल्वे पोलिसांनी गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या एका हातभट्टीवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी सुमारे ९ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हा सर्व जप्त केलेला मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी तक्रार निवारण दिनानिमित्त दत्तापूर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. अधीक्षकांनी पोलीस ठाण्याची सविस्तर पाहणी करत अधिकारी, अमलदार व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी त्यांनी संयमाने ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या तत्काळ निराकरणाच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त, काही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते पूर्णपणे बंद ठेवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी उपस्थितांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्तापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अमलदार व कर्मचारी उपस्थित होते. या तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली मते व समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.1
- ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर साठ टक्के जनता एकत्र येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये काय परिणाम होतील, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी प्रा. हाके यांनी केली आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथे एका ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज नेवारे असे मृतकाचे नाव असून, तो रोज मजुरीचे काम करत होता. या घटनेची नोंद वडगाव जंगल पोलिसांनी घेतली असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे जेष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांची सदिच्छा भेट घेतली. 'अरुणोदय' येथे झालेल्या या भेटीदरम्यान, दोघांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.1
- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा-पांगरी महादेव रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या रखडलेल्या कामाविरोधात समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. रविवारी (३१ मे) सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेदरम्यान ग्रामस्थ समृद्धी महामार्गावर आंदोलनासाठी एकत्र आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आणि सोमवारी संबंधित विभागाची बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तात्पुरते पुढे ढकलले. यानंतर उपअभियंता आणि ठाणेदार यांना पुन्हा निवेदन देत पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भरणे, कामादरम्यान नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे तसेच मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार काम करण्याची मागणी प्रामुख्याने नमूद करण्यात आली. रस्त्याच्या निकृष्ट स्थितीमुळे अपघात झाल्यास जखमींच्या उपचाराचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामाच्या गुणवत्तेची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी व्हावी आणि काम पूर्ण होईपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून देखरेख करावीत, अशीही त्यांची मागणी आहे. याशिवाय, संपूर्ण टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एका ठेकेदाराला एकाचवेळी अनेक कामे कोणत्या निकषांवर देण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. टेंडर प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या भूमिकेची सखोल तपासणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रस्त्याच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणारे किशोर देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान तहसीलदार अनासाने, पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर व किशोर शेळके यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. दरम्यान, खासदार संजय देशमुख यांनीही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई न केल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.4