logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोयगाव : जरंडी येथे ५४ वर्षीय नराधमाकडून ८० वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला बेड्या सोयगाव : जरंडी येथे ५४ वर्षीय नराधमाकडून ८० वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला बेड्या सोयगाव : तालुक्यातील जरंडी गावात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. ५४ वर्षीय नराधमाने ८० वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून सोयगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला रात्री घरात एकटी झोपलेली असताना आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. हा अमानुष प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेमुळे जरंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सोयगाव पोलीस करत आहेत.

23 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
23 hrs ago
79cdf889-d79c-4d8f-8a3a-315af0475f9a

सोयगाव : जरंडी येथे ५४ वर्षीय नराधमाकडून ८० वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला बेड्या सोयगाव : जरंडी येथे ५४ वर्षीय नराधमाकडून ८० वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला बेड्या सोयगाव : तालुक्यातील जरंडी गावात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. ५४ वर्षीय नराधमाने ८० वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून सोयगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला रात्री घरात एकटी झोपलेली असताना आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. हा अमानुष प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेमुळे जरंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सोयगाव पोलीस करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा
सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे.
डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले.
या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Kishor k Patil Patil
    2
    Post by Kishor k Patil Patil
    user_Kishor k Patil Patil
    Kishor k Patil Patil
    पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • #jalna#marathinews#
    1
    #jalna#marathinews#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    1 hr ago
  • भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    1
    भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे. या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    1
    या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे.
या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    5 hrs ago
  • चिखलीत न्याय मिळेना! लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट; पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..! बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. हे पत्र आहे एका हतबल पित्याचं, ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे. आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, ४५ दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून, पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबीयांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ०६ मार्च २०२६ पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषणाला' बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आरोपी दीड-दीड महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
    1
    चिखलीत न्याय मिळेना! लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट; पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..!
बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये.
हे पत्र आहे एका हतबल पित्याचं, ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे.
आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले.
पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, ४५ दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून, पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे.
न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबीयांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ०६ मार्च २०२६ पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषणाला' बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.
एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आरोपी दीड-दीड महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • #marathi#news#jalna#
    1
    #marathi#news#jalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.