Shuru
Apke Nagar Ki App…
महत्वाची अपडेट महाराष्ट्र विधानसभेत मुलांचे मुलींचे विवाह जमत नाही याची गंभीर दाखल घेण्यात आली खरंच याबाबत मुला मुलींच्या आई वडिलांनी तरी थोडाफार विचार करावा नाही तर भविष्यात खानदानी मुले मुली मिळणे मुश्किल होऊन जाईल
Kishor k Patil Patil
महत्वाची अपडेट महाराष्ट्र विधानसभेत मुलांचे मुलींचे विवाह जमत नाही याची गंभीर दाखल घेण्यात आली खरंच याबाबत मुला मुलींच्या आई वडिलांनी तरी थोडाफार विचार करावा नाही तर भविष्यात खानदानी मुले मुली मिळणे मुश्किल होऊन जाईल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰1
- #marathi#news#jalna#1