Shuru
Apke Nagar Ki App…
शिरपूरमध्ये अनोखे आंदोलन; महामार्गावरील खड्ड्यात बसून केली सत्यनारायण पूजा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
Dhule News 24
शिरपूरमध्ये अनोखे आंदोलन; महामार्गावरील खड्ड्यात बसून केली सत्यनारायण पूजा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- येवला: नाशिक जिल्ह्यात होळीनंतर पाचव्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा. पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपत 'रंगांचे सामने' मोठ्या थाटात पार पडले. वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगांत न्हाऊन निघालं होतं. शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगांचे मोठे ड्रम भरून आणले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या खेळाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना, एकमेकांवर होणारा रंगांचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. टिळक मैदानानंतर हे सामने डी जे रोड परिसरात रंगले. हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सामन्यांची सुरुवात रंगांच्या आझाद चौक व डीजे रोड येथे ट्रॅक्टर समोर कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ वाढून सुरुवात करण्यात आले याप्रसंगी संजय कुक्कुर, अविनाश कुक्कर, प्रभाकर झळके सर शिवसेनेतर्फे यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना गटनेते शिंदे,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, रोहित जावळे, सागर शिंदे शहर प्रमुख विशाल परदेशी प्रशांत शिंदे बंटी कुक्कर अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1