logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जावयाचा संशयास्पद मृत्यू , मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकळवाडी येथे एका २९ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घातपाताचा बळकट संशय व्यक्त केला जात असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रमुख सुधाकर आढे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समांतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.सुरेश राजाराम झळके (वय २९, रा. अमानी, ता. मालेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेशची वाकळवाडी येथे सासरवाडी असून, गुरुवारी (३० जुलै) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाकळवाडी येथील शेतशिवारात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच मेडशी चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद इंगळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलीस उपविभागीय अधिकारी पवार आणि पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, या घटनेमागे हत्येचा कट असण्याची शक्यता लक्षात घेता वाशिम LCB प्रमुख सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तत्काळ सूत्रे हाती घेतली आहेत. स्थानिक पोलिसांसोबतच LCB चे पथकही या प्रकरणात समांतर तपास करत असून, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाचा मार्ग निश्चित केला जात आहे.पोलीस व LCB च्या संयुक्त कारवाईतून या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेशचा मृत्यू नेमका कसा झाला आणि यामागे कोणती कारणे आहेत, याचा शोध घेण्यासाठी LCB प्रमुख सुधाकर आढे व त्यांचे पथक कसून चौकशी करत आहे.

1 day ago
user_के.के. रिपोर्टर
के.के. रिपोर्टर
Spa रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
1 day ago
4d75fc97-2db3-4e4a-99cd-119020284f8e

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जावयाचा संशयास्पद मृत्यू , मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकळवाडी येथे एका २९ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घातपाताचा बळकट संशय व्यक्त केला जात असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रमुख सुधाकर आढे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समांतर तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.सुरेश राजाराम झळके (वय २९, रा. अमानी, ता. मालेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेशची वाकळवाडी येथे सासरवाडी असून, गुरुवारी (३० जुलै) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाकळवाडी येथील शेतशिवारात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच मेडशी चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद इंगळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलीस उपविभागीय अधिकारी पवार आणि पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, या घटनेमागे हत्येचा कट असण्याची शक्यता लक्षात घेता वाशिम LCB प्रमुख सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तत्काळ सूत्रे हाती घेतली आहेत. स्थानिक पोलिसांसोबतच LCB चे पथकही या प्रकरणात समांतर तपास करत असून, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाचा मार्ग निश्चित केला जात आहे.पोलीस व LCB च्या संयुक्त कारवाईतून या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेशचा मृत्यू नेमका कसा झाला आणि यामागे कोणती कारणे आहेत, याचा शोध घेण्यासाठी LCB प्रमुख सुधाकर आढे व त्यांचे पथक कसून चौकशी करत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    1
    बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग
बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में  बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए।
अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।
यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    user_गुफरान शेख
    गुफरान शेख
    Local News Reporter बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन ​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    1
    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन


​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    1
    लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.