गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी समन्वयाने काम करा : उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांचे आरोग्य विभागाला निर्देश बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग, अकोला मंडळाचे उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांनी दिले. समुदाय आरोग्य अधिकारी व्यक्तिमत्व तथा कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन उपसंचालक सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून गावपातळीवरील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाचाही आढावा घेतला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) शहरी भागातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, विविध आरोग्य उपक्रम आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत (NTEP) क्षयरोग शोध, निदान, उपचार, रुग्णांचे समुपदेशन तसेच निक्षय पोषण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा, उपलब्ध आरोग्य सुविधा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या कामकाजाची माहिती घेताना उपसंचालकांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. हरी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांच्यासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी उपस्थित होते. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन उपसंचालक वाकचौरे यांनी केले. 00000

- भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..1
- जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.1
- साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. ##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. सोमेश मुळे जळगाव: साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- बिहारमध्ये सरकारचा राजीनामा मागितला म्हणून पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं..1
- आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”4
- वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,1
- खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी खुलताबाद उर्स, वेरुळात हरवलेली १० मुले सुखरूप सापडली; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी1
- महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. महिलेवरून झालेला वाद पेटला; नागेवाडीत ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या.. धारदार शस्त्राने हल्ला; संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान ३० वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1