भिगवण–राशीन राज्य महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात….. अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू….. या *राज्य महामार्गावरील हा सातवा अपघात……* इंदापूर तालुक्यातील भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि चारचाकी स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार (एम.एच. 12 के.वाय. 1615) आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एम.एच. 45 एफ 3025) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी वाहनातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नसली, तरी या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात बारामती–राशीन राज्य महामार्गावरील हा सातवा बळी ठरला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांच्या बेफिकीर व नियमबाह्य वाहनचालना मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
भिगवण–राशीन राज्य महामार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात….. अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू….. या *राज्य महामार्गावरील हा सातवा अपघात……* इंदापूर तालुक्यातील भिगवण–राशीन राज्य महामार्गावर डिकसळ गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि चारचाकी स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार (एम.एच. 12 के.वाय. 1615) आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एम.एच. 45 एफ 3025) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. या अपघातात अतुल बाबूलाल गजरमल (रा. कात्रज, ता.
करमाळा, जि. सोलापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी वाहनातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नसली, तरी या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात बारामती–राशीन राज्य महामार्गावरील हा सातवा बळी ठरला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांच्या बेफिकीर व नियमबाह्य वाहनचालना मुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
- पोलीस अंमलदाराने विहीरीत उडी घेतलेल्या शेतकाऱ्याचे वाचविले प्राण.1
- Post by Jsr Udhfd1
- Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI1
- धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत1
- Post by Riyazisaksayyed1
- १४ जानेवारी. मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसर फुलांच्या भव्य सजावटीने नटला आहे.ही आकर्षक सजावट स्थानिक देणगीदार आणि सच्च्या साईभक्त श्री कैलाश शहा यांच्या उदार देणगीतून साकार झाली आहे. रंगबिरंगी फुलांचे हार, टॉवर आणि आकृत्या पाहून भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.साईमूर्तीभोवती टपकणाऱ्या फुलांचे व्हील्स आणि परिसरातील प्रत्येक कोपऱ्यातील सजावट संक्रांतीच्या आठवडाभर टिकेल. श्री शहा म्हणाले, "साईबाबांच्या कृपेने ही देणगी देत आहे, भक्तांना आनंद मिळो यासाठी."दर्शनासाठी प्रचंड गर्दी. JTV मराठी न्यूजकडून शुभेच्छा!1
- पाले येथून राहत्या घरातून 4 लाख 55 हजारांच्या दागिन्यांची चोरी विक्रम शिंदे /भोर दि.१३ तालुक्याच्या वीस गांव खोरे भागातील पाले - वरवडी ता .भोर येथून राहत्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी जीवन अंकुश भोसले यांनी भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.भोसले यांनी राहत्या घरातील लोखंडी कपाटात 3 लाख 50 हजार किंमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण ,1लाख रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचा नेकलेस आणि 5 हजाराचे चांदीचे पैंजण ठेवले होते.मात्र कोणीतरी अज्ञाताने लोखंडी कपाट कशाने तरी उघडून दागिने चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुंभार पुढील तपास करीत आहेत.1
- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तारखा केल्या जाहीर1
- Post by YUVA JALNA NEWS1