वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पेडगाव (मंगरूळपीर) येथील गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मिटला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावातील प्रत्येक घराघरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचले असून, यामुळे पेडगावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे कराव्या लागलेल्या संघर्षाची दखल घेत, पत्रकार विश्वास कुटे यांनी हा गंभीर प्रश्न सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणला. त्यांनी शासन स्तरावर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभावी पाठपुरावा करत रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. या पाठपुराव्याचे फलित म्हणून, २२ जून रोजी पेडगावमध्ये नळ योजनेद्वारे प्रत्यक्ष घराघरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे पाण्यासाठी दूरवर भटकंती करणाऱ्या महिला आणि इतर ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी समस्या दूर झाली आहे. गावाच्या मूलभूत गरजेचा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पत्रकार विश्वास कुटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी म्हटले आहे की, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज पेडगावची तहान भागली असून, हा पेडगावच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रसंगी पत्रकार विश्वास कुटे यांनी भविष्यातही पेडगावच्या विकासासाठी कोणतीही समस्या असल्यास ती प्रशासनापर्यंत पोहोचवून सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, पेडगावच्या सर्वांगीण विकासाची एक नवी दिशा सुरू झाल्याची भावना व्यक्त केली आहे, कारण १५ वर्षांचा पाणी वनवास संपल्याने पेडगावात विकासाची नवी पहाट उगवली आहे.
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पेडगाव (मंगरूळपीर) येथील गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मिटला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावातील प्रत्येक घराघरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचले असून, यामुळे पेडगावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे कराव्या लागलेल्या संघर्षाची दखल घेत, पत्रकार विश्वास कुटे यांनी हा गंभीर प्रश्न सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणला. त्यांनी शासन स्तरावर तसेच संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभावी पाठपुरावा करत रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले. या पाठपुराव्याचे फलित म्हणून, २२ जून रोजी पेडगावमध्ये नळ योजनेद्वारे प्रत्यक्ष घराघरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे पाण्यासाठी दूरवर भटकंती करणाऱ्या महिला आणि इतर ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी समस्या दूर झाली आहे. गावाच्या मूलभूत गरजेचा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पत्रकार विश्वास कुटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ग्रामस्थांनी म्हटले आहे की,
त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज पेडगावची तहान भागली असून, हा पेडगावच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रसंगी पत्रकार विश्वास कुटे यांनी भविष्यातही पेडगावच्या विकासासाठी कोणतीही समस्या असल्यास ती प्रशासनापर्यंत पोहोचवून सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, पेडगावच्या सर्वांगीण विकासाची एक नवी दिशा सुरू झाल्याची भावना व्यक्त केली आहे, कारण १५ वर्षांचा पाणी वनवास संपल्याने पेडगावात विकासाची नवी पहाट उगवली आहे.
- श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.1
- अमरावती शहरातील सरस्वती नगरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.1
- जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.1
- गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.1
- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.1
- वाशिम जिल्ह्यांतर्गत असलेल्या डोंगर किणी गावामध्ये बैलाच्या कोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.1