logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.

2 hrs ago
user_Prakash Bhise
Prakash Bhise
Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago

जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.
    1
    जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.

निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.
    user_Prakash Bhise
    Prakash Bhise
    Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    1
    शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    1
    श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.

या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले.

यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले.

भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    8 hrs ago
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा येथे एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. सपकाळ यांनी प्रश्न विचारला की, जर आमदारांचा भाव '५० खोके' इतका आहे, तर खासदारांचा भाव नेमका किती आहे?
    1
    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा येथे एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. सपकाळ यांनी प्रश्न विचारला की, जर आमदारांचा भाव '५० खोके' इतका आहे, तर खासदारांचा भाव नेमका किती आहे?
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    31 min ago
  • सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी सध्या अनेक समस्यांनी त्रस्त असून त्यांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी आज सिंदखेडराजा येथील तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांची विनाअट कर्जमुक्ती करावी आणि गेल्या हंगामातील अतिवृष्टीचे थकीत पॅकेज तात्काळ जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या निवेदनात मागणी करण्यात आली की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आर्थिक पॅकेज शेतकऱ्यांना त्वरित सुपूर्द केले जावे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली प्रचंड महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची थकीत रक्कम आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रासायनिक खते आणि बि-बियाणांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावेत. 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पेरणी लांबल्याने, शासनाने कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांची (बियाण्यांची) उपलब्धता करून द्यावी आणि गावनिहाय कृषी विभागामार्फत याची जनजागृती करावी. नवीन रेशनकार्ड आणि विभक्त रेशनकार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तात्काळ धान्य वाटप सुरू करण्यात यावे. तसेच, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे पेट्रोल, डिझेल व इतर आवश्यक इंधनाचे दर कमी करावेत. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे/युवासेना) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह संपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख बद्रीभाऊ बोडखे, तालुका प्रमुख आत्माराम शेळके, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे, शहर प्रमुख उल्हास भुसारे, तालुका संघटक म्हसाजी वाघ, युवासेना उपतालुका प्रमुख अविनाश मोगल, उपतालुका प्रमुख रंजित मरमट, शहर प्रमुख शिवाजीराव देशमुख आणि विभाग प्रमुख भागवत मुरकुट यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव निवेदन सादर करताना उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    1
    सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी सध्या अनेक समस्यांनी त्रस्त असून त्यांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी आज सिंदखेडराजा येथील तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांची विनाअट कर्जमुक्ती करावी आणि गेल्या हंगामातील अतिवृष्टीचे थकीत पॅकेज तात्काळ जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या निवेदनात मागणी करण्यात आली की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आर्थिक पॅकेज शेतकऱ्यांना त्वरित सुपूर्द केले जावे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली प्रचंड महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची थकीत रक्कम आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रासायनिक खते आणि बि-बियाणांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावेत. 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पेरणी लांबल्याने, शासनाने कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांची (बियाण्यांची) उपलब्धता करून द्यावी आणि गावनिहाय कृषी विभागामार्फत याची जनजागृती करावी. नवीन रेशनकार्ड आणि विभक्त रेशनकार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तात्काळ धान्य वाटप सुरू करण्यात यावे. तसेच, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे पेट्रोल, डिझेल व इतर आवश्यक इंधनाचे दर कमी करावेत.

यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे/युवासेना) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह संपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख बद्रीभाऊ बोडखे, तालुका प्रमुख आत्माराम शेळके, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर आंधळे, शहर प्रमुख उल्हास भुसारे, तालुका संघटक म्हसाजी वाघ, युवासेना उपतालुका प्रमुख अविनाश मोगल, उपतालुका प्रमुख रंजित मरमट, शहर प्रमुख शिवाजीराव देशमुख आणि विभाग प्रमुख भागवत मुरकुट यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी बांधव निवेदन सादर करताना उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खामगाव: शेगाव रस्त्यावरील माउली वॉटर पार्कजवळ आज सोमवारी, २२ जून २०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील नवा अंदुरा येथील ५३ वर्षीय दुचाकीस्वार शिवशंकर तुळशीराम झाडे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक शिवशंकर झाडे हे त्यांच्या MH-30-N-9730 क्रमांकाच्या मोटारसायकलने शेगावहून खामगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या MH-23-AS-0090 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात शिवशंकर झाडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडवून कार चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना न देता, आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी, मृताचे पुतणे अनिकेत नागोराव झाडे (वय २९, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) यांनी शेगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तोंडी तक्रारीवरून आणि ओपीडी मेमोवरून दुपारी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    खामगाव: शेगाव रस्त्यावरील माउली वॉटर पार्कजवळ आज सोमवारी, २२ जून २०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील नवा अंदुरा येथील ५३ वर्षीय दुचाकीस्वार शिवशंकर तुळशीराम झाडे यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतक शिवशंकर झाडे हे त्यांच्या MH-30-N-9730 क्रमांकाच्या मोटारसायकलने शेगावहून खामगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या MH-23-AS-0090 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात शिवशंकर झाडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडवून कार चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना न देता, आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी, मृताचे पुतणे अनिकेत नागोराव झाडे (वय २९, रा. नवा अंदुरा, ता. बाळापूर) यांनी शेगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तोंडी तक्रारीवरून आणि ओपीडी मेमोवरून दुपारी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    35 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.