logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा येथे एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. सपकाळ यांनी प्रश्न विचारला की, जर आमदारांचा भाव '५० खोके' इतका आहे, तर खासदारांचा भाव नेमका किती आहे?

1 hr ago
user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा येथे एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. सपकाळ यांनी प्रश्न विचारला की, जर आमदारांचा भाव '५० खोके' इतका आहे, तर खासदारांचा भाव नेमका किती आहे?

More news from Buldhana and nearby areas
  • राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    1
    राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    23 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जून महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि हळद लागवड पूर्णपणे खोळंबली आहे. दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेतीची मशागत करून शेतात बेड तयार केले असले तरी, पाऊस नसल्याने हळदीचे बियाणे अद्याप घरातच पडून आहे. दुसरीकडे, त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून, सात फूट व्यासाच्या विहिरीत पाणी तब्बल ५० फूट खोलवर गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत असून पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. वेळेत पेरणी व लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
    4
    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सध्या पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जून महिना उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि हळद लागवड पूर्णपणे खोळंबली आहे.

दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेतीची मशागत करून शेतात बेड तयार केले असले तरी, पाऊस नसल्याने हळदीचे बियाणे अद्याप घरातच पडून आहे. दुसरीकडे, त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून, सात फूट व्यासाच्या विहिरीत पाणी तब्बल ५० फूट खोलवर गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत असून पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे.

वेळेत पेरणी व लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.
    1
    जळगाव (जामोद) तालुक्यात विविध घरकुल योजनांमधील हजारो लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते अद्यापही वितरित न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या गंभीर प्रश्नावर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.

निवेदनाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समिती जळगाव जामोद येथे नव्याने नियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचे DSC अद्याप सक्रिय नसल्याने घरकुल निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

प्रकाश भिसे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरिबांच्या हक्काचे घरकुल रोखले जात असेल, तर लाभार्थी शांत बसणार नाहीत. त्यांनी तात्काळ हप्ते वितरित करण्याची मागणी केली, अन्यथा लाभार्थ्यांसह तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारले जाईल. निवेदन देतेवेळी अशपाक भाई देशमुख, राजेंद्रभाऊ परिहार, कार्तिक भाऊ राऊत, विलासभाऊ दातीर, भगवान भाऊ बघे आदी नागरिक उपस्थित होते. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी “घरकुलाचा हक्क द्या… अन्यथा रस्त्यावर उतरू!” असा निर्धार व्यक्त केला.
    user_Prakash Bhise
    Prakash Bhise
    Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    1
    श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.

या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले.

यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले.

भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    9 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    1
    शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी मविआने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी करण्यात आले.
    1
    शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी मविआने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी करण्यात आले.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मंठा शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या मोबाईल फोन व आधार कार्डावरून त्याची ओळख जनार्धन बेळजी नादरे (वय ३९ वर्षे) अशी पटली. ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    मंठा शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या जवळ सापडलेल्या मोबाईल फोन व आधार कार्डावरून त्याची ओळख जनार्धन बेळजी नादरे (वय ३९ वर्षे) अशी पटली. ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
    1
    अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.