९७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार ९७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार धाराशिव | प्रतिनिधी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, त्यापैकी ९७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, संबंधित बँका तसेच शासन सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात नव्याने पीककर्ज घेण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय, सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांतील निकषांनुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले. काही प्रकरणांमध्ये आधार प्रमाणीकरण अपूर्ण असणे, बँक खाते आधारशी संलग्न नसणे, वारसदारांची नोंद प्रलंबित असणे किंवा महसूल व बँकेच्या नोंदींमध्ये तफावत असणे यामुळे लाभ मिळण्यास विलंब होत आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक, तहसील कार्यालय किंवा शासन सेवा केंद्राशी संपर्क साधून आवश्यक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम आणि प्रोत्साहनपर अनुदान टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत माहितीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1