logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली

5 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    1
    कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले.
हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली.
दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    1
    8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष!
रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी.
महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध!
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026.
लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले.
लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती.
तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला.
"गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." 
यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    1
    लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 
भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले. महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
    2
    छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,४८२ नागरिकांना विविध योजनांचा लाभ
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामधून विविध महसूल व शासकीय योजनांचा लाभ एकूण १,४८२ लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहेत. याशिबिरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिवंत सातबारा मोहीम, घरकुल योजना, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, शेतजमिनींच्या नोंदणी शुल्क माफीसह विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व लाभ देण्यात आला.
उपलब्ध माहितीनुसार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७०, जिवंत सातबारा मोहिमेत ६०, घरकुल योजनेत ५०, नोंदणी शुल्क माफीचा लाभ २०, तर राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ६००, केंद्र शासनाच्या योजनांचा ५०, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा ६५ आणि इतर विविध लाभ ५४१ नागरिकांना देण्यात आले.
महसूल विभागाच्या या विशेष अभियानामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत झाली असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.