logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील 'गोपालकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित' (र.नं. ३०३) च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत उषाताई गजानन गडम यांची अध्यक्षपदी, तर रुपेश गोवर्धन रेळे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिसूचनेनुसार या संस्थेच्या संचालक मंडळावर नवीन सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. अविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात सर्वसाधारण मतदार संघातून दत्तात्रय गजानन गडम, अनंता वसंता गडम, रामदास रामचंद्र गडम, रुपेश गोवर्धन रेळे, दिपक श्रीधर साबळे आणि अशोक महादेव गेबड यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून प्रदिप साहेबराव वानखडे, महिला प्रतिनिधी म्हणून सुनिता संजय गडम आणि उषाताई गजानन गडम, तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून गजानन साहेबराव गडम यांची अविरोध निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेनंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी अकोला जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघ कार्यालयाला भेट दिली. गावकऱ्यांच्या मते, अमोल गडम, संजय श्रीकृष्ण गडम, कैलास रेळे, धनराज गडम, दिवाकर रेळे, प्रभाकर वानखडे आणि वसंतराव गडम यांच्या विशेष सहकार्यामुळेच ही निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडून गावपातळीवर एकी राखता आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांवर संपूर्ण गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वात दूध उत्पादक संस्थेचा विकास अधिक गतीने होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

2 hrs ago
user_राजकुमार वानखडे
राजकुमार वानखडे
News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
2 hrs ago
39accffb-e7ad-494c-bcd7-342576ca1756

अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील 'गोपालकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित' (र.नं. ३०३) च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत उषाताई गजानन गडम यांची अध्यक्षपदी, तर रुपेश गोवर्धन रेळे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिसूचनेनुसार या संस्थेच्या संचालक मंडळावर नवीन सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. अविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात सर्वसाधारण मतदार संघातून दत्तात्रय गजानन गडम, अनंता वसंता गडम, रामदास रामचंद्र गडम, रुपेश गोवर्धन रेळे, दिपक श्रीधर साबळे आणि अशोक महादेव गेबड यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून प्रदिप साहेबराव वानखडे, महिला प्रतिनिधी म्हणून सुनिता संजय गडम आणि उषाताई गजानन गडम, तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून गजानन साहेबराव गडम यांची अविरोध निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेनंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी अकोला जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघ कार्यालयाला भेट दिली. गावकऱ्यांच्या मते, अमोल गडम, संजय श्रीकृष्ण गडम, कैलास रेळे, धनराज गडम, दिवाकर रेळे, प्रभाकर वानखडे आणि वसंतराव गडम यांच्या विशेष सहकार्यामुळेच ही निवडणूक शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडून गावपातळीवर एकी राखता आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांवर संपूर्ण गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वात दूध उत्पादक संस्थेचा विकास अधिक गतीने होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    1
    शेतकरी विकास मंचाने अकोला येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर शहरात हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली. दर्यापूर शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेनंतर पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी सज्जता दर्शवण्यात आली आहे.
    1
    पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर शहरात हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली. दर्यापूर शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेनंतर पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी सज्जता दर्शवण्यात आली आहे.
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • डॉ. झीशान हुसैन यांनी म्हटले आहे की, हिंदू-मुस्लिम एकजुटीमुळे काँग्रेसने भाजपला पराभूत केले आहे.
    1
    डॉ. झीशान हुसैन यांनी म्हटले आहे की, हिंदू-मुस्लिम एकजुटीमुळे काँग्रेसने भाजपला पराभूत केले आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    1 day ago
  • श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले. भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    1
    श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात ‘सावली सेवा प्रकल्पाने’ साकारलेल्या जिवंत पालखी सोहळ्याच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पालखी मार्गावर उभारण्यात आलेला हा आकर्षक आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. अकोल्यातील प्रसिद्ध डेकोरेशन कलाकार जगदीश मारमपल्ली यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या अप्रतिम कलाकृतीने वारीचा अनुभव अक्षरशः जिवंत करून दाखवला. देखाव्याची भव्यता, बारकावे आणि वास्तवदर्शी मांडणी पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.

या अनोख्या देखाव्यासमोर हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सेल्फी, छायाचित्रे काढत वारीचा आनंद द्विगुणित केला. सोशल मीडियावरही या देखाव्याची मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले.

यावेळी सावली सेवा प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी श्रींच्या चरणी विशेष प्रार्थना अर्पण केली. राज्यातील शेतकरी, पशुपक्षी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच पावसाची प्रतीक्षा लवकर संपून भरपूर पाऊस व्हावा, असे साकडे त्यांनी श्री संत गजानन महाराजांना घातले.

भक्ती, कला आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम घडवणारा सावली सेवा प्रकल्पाचा हा जिवंत पालखी सोहळा यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरला.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    4 hrs ago
  • पातुर येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हिद्दू पैलवान यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली.
    1
    पातुर येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हिद्दू पैलवान यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली.
    user_Irfan Shaikh
    Irfan Shaikh
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'योगातून आरोग्य आणि निरोगी जीवन' हा संदेश देत, आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), सुनगांव यांच्या वतीने स्थानिक सराई महादेव मंदिर परिसरात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात योगासनांनी झाली, जिथे योगा प्रशिक्षक सुरेश काळपांडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध योगासने आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. काळपांडे यांनी योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यासोबतच मानसिक शांतता कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमकर्डे यांनी 'योगा व आरोग्य' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, नियमित योगाभ्यासामुळे केवळ शारीरिक व्याधीच दूर होत नाहीत, तर मनावर नियंत्रण मिळवून तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते. आरोग्य विभागाच्या पथकानेही ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शारदा पंडित, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, आरोग्य सेवक संदीप पोले, प्रतीक पाटील, आरोग्य सेविका सारिका इंगळे, आरती इंगळे आणि आशा सेविकांची विशेष उपस्थिती होती. सुनगांव गावातील मोठ्या संख्येने नागरिक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते, ज्यांनी सर्वांनी मिळून योगासने करत निरोगी राहण्याचा संकल्प केला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावर रविवारी अंदुरा गावाजवळ एका भीषण रस्ते अपघातात अकोट शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण आपल्या मोटारसायकलवरून शेगावहून अकोटला जात असताना अंदुरा गावाजवळ त्यांच्या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटारसायकल शेगावकडे जाणाऱ्या समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) बसला धडकली. या धडकेचा परिणाम इतका भीषण होता की, दोन्ही तरुण बसच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे अकोट शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिक अत्यंत दुःखी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. सध्या उरळ पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणाचा सखोल तपास करत आहेत.
    4
    अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावर रविवारी अंदुरा गावाजवळ एका भीषण रस्ते अपघातात अकोट शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण आपल्या मोटारसायकलवरून शेगावहून अकोटला जात असताना अंदुरा गावाजवळ त्यांच्या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटारसायकल शेगावकडे जाणाऱ्या समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) बसला धडकली. या धडकेचा परिणाम इतका भीषण होता की, दोन्ही तरुण बसच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे अकोट शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिक अत्यंत दुःखी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. सध्या उरळ पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणाचा सखोल तपास करत आहेत.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.