कल्याण क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; ३ वर्षांपासून गुंगारा देणारे 'मोस्ट वाँटेड' सख्खे भाऊ जेरबंद कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसां गुंगारा देत गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांच्या मुसक्या आवळण्यात कल्याण क्राईम ब्रँचला अखेर यश आले आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात सापळा रचून या दोन्ही अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही यापूर्वीच 'फरार' घोषित केले होते. नेमके प्रकरण काय? विनोद जगन्नाथ कांबळे आणि नागसेन ऊर्फ नागेश जगन्नाथ कांबळे (रा. वालधुनी, कल्याण-पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन वर्षांपूर्वी कल्याणमध्ये एकावर प्राणघातक सशस्त्र हल्ला करून या दोघांनी परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते. आरोपी वारंवार आपला ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. हजर न झाल्यामुळे कल्याण न्यायालयाने १७ जानेवारी २०२३ रोजी त्यांच्या विरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. अनुभवाचा कस आणि गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी आपल्या अनुभवाचा कस पणाला लावून या गुंडांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पोलीस शिपाई गोरक्ष शेकडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे दोघे भाऊ भिवंडीतील काल्हेर गावात लपून बसले आहेत. माहिती मिळताच क्राईम ब्रँचने तातडीने चक्र फिरवली. असा रचला सापळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण भिसे आणि पथकाने काल्हेर गावातील हळदीराम गोडाऊनमागील सी.जी. पार्क बिल्डिंगजवळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या विनोद आणि नागेश या दोन्ही बदमाशांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर दोघांनाही पुढील कार्यवाहीसाठी महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना ३ वर्षांनंतर गजाआड करणाऱ्या या पथकाचे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Ek kavita...... HINDI.1
- देखें पूरी खबर हमारे यूट्यूब चैनल पर 👇👇👇👇 https://youtu.be/i3xra0OzoJk1
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- Post by विशेष तपास न्युज1