हातगाव-शेलोडी परिसरात वाघाचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हातगाव-शेलोडी परिसरात वाघाचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- Post by Amravati News Update1
- yah gandgi ki vajah se bahut pareshani ho rahi hai aur bimari bhi bahut ho rahi hai prashasan se gujarish hai iske bare mein kuchh kiya jaaye4
- विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.2
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये नगर परीषदेच्या वतीने सन्मान सोहळा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर परीषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी राजु घोडके यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.1