logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील गोपाळपूरच्या 'श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट' संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी तंत्रज्ञानावर आधारित तीन अभिनव संशोधन प्रकल्प विकसित करून त्यांचे पेटेंट प्रकाशित करण्यात मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी केवळ हे प्रकल्प विकसित केले नाहीत, तर पेटंटचा शोध घेणे (प्रायर आर्ट सर्च), मसुदा लेखन, दावे तयार करणे, अर्ज दाखल करणे आणि पेटेंट प्रकाशित होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतः पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांची ही ऐतिहासिक कामगिरी स्वेरीमधील संशोधन संस्कृती आणि ऑटोनॉमस अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तीन प्रकल्पांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायल शिंदे, गौरी साळुंखे, श्रद्धा भोंग आणि आर्य परकाळे यांनी तयार केलेल्या 'अॅन ऑटोनॉमस वेअरेबल पर्सनल सेफ्टी सिस्टम् युटीलायझिंग मल्टी मॉडेल सेन्सर फ्युजन अँड रिअल टाईम कम्युनिकेशन' या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प स्मार्ट बँड, घड्याळ किंवा लॉकेटच्या माध्यमातून धोकादायक परिस्थिती ओळखून पोलीस आणि कुटुंबियांना थेट संदेश पाठवतो. दुसरा प्रकल्प ऋतुराज कोरे आणि ऋतुजा कोरे यांनी विकसित केलेला 'थर्मो इलेक्ट्रीक जनरेटर बेस्ड सेल्फ पॉवर्ड किचेन एक्झाष्ट सिस्टम युजिंग गॅस स्टोव्ह, वेस्ट हिट रिकव्हरी' हा असून, तो गॅस स्टोव्हच्या वाया जाणाऱ्या उष्णतेपासून वीज तयार करून त्यावर स्वयंपाकघरातील धूरनियंत्रक यंत्रणा चालवतो. तिसरा 'क्लिअर फ्लो स्मार्ट मोनीटोरिंग इंडस्ट्रीजयल वेस्ट रीसर्क्युलेशन सिस्टम' हा औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर करणारा पर्यावरणपूरक प्रकल्प श्वेता कोरे, साक्षी पाटील आणि प्रतीक्षा सावंत यांनी विकसित केला आहे. स्वेरीच्या ऑटोनॉमस अभ्यासक्रमात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), उत्पादन विकास आणि उद्योजकता यांसारख्या उद्योगाभिमुख विषयांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही संशोधक दृष्टी विकसित झाली आहे. या यशासाठी संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. निता तळवळकर आणि प्रा. आशुतोष गरड यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीमध्ये सुरुवातीपासूनच संशोधनाची संस्कृती रुजलेली असून, संस्थेने आजवर एकूण ७९ पेटेंट दाखल केले आहेत. त्यापैकी ७६ पेटेंट प्रकाशित झाले असून, ५ पेटेंट मंजूर झाले आहेत आणि ३ पेटेंट सध्या प्रक्रियेत आहेत.

1 hr ago
user_Tej maharashtra varta
Tej maharashtra varta
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
ae9ac69c-6d26-49c9-ab8c-a9e46939213e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. सचिनजी अहिर साहेब अक्कलकोट येथे आले होते. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि अक्कलकोटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीसह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांशी विविध विकासकामांबाबत आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.
    1
    अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. सचिनजी अहिर साहेब अक्कलकोट येथे आले होते. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि अक्कलकोटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.

या प्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीसह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांशी विविध विकासकामांबाबत आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    33 min ago
  • पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।
    1
    पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कराडमधील शेनोली येथे एमडी ड्रग्स विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली असून ड्रग्स विक्रीचा त्यांचा कट यशस्वीरीत्या हाणून पाडला आहे.
    1
    कराडमधील शेनोली येथे एमडी ड्रग्स विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली असून ड्रग्स विक्रीचा त्यांचा कट यशस्वीरीत्या हाणून पाडला आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    1
    मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.