logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुण्यातील कोंढवा परिसरातील 'इराणी टी कॅफे'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशासनाने एक्स्पायरी डेटचे खाद्यपदार्थ जप्त करत संबंधित साहित्य ताब्यात घेतले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर झालेल्या या धडक कारवाईमुळे अशा घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।

2 hrs ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

पुण्यातील कोंढवा परिसरातील 'इराणी टी कॅफे'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले असून, प्रशासनाने एक्स्पायरी डेटचे खाद्यपदार्थ जप्त करत संबंधित साहित्य ताब्यात घेतले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर झालेल्या या धडक कारवाईमुळे अशा घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    1
    औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जालन्यात आरटीओ अधिकाऱ्यांची बदनामी करणे आता संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. सोशल मीडियावरील खोट्या पोस्टद्वारे अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात आता थेट कारवाई केली जाणार आहे.
    1
    जालन्यात आरटीओ अधिकाऱ्यांची बदनामी करणे आता संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. सोशल मीडियावरील खोट्या पोस्टद्वारे अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात आता थेट कारवाई केली जाणार आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील 'सिल्लोड भवन' परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. या भागात पाणी टंचाईची ही समस्या सातत्याने बिकट होत चालली आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील 'सिल्लोड भवन' परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. या भागात पाणी टंचाईची ही समस्या सातत्याने बिकट होत चालली आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    1
    'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
  • पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    1
    पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळून जाणाऱ्या जळगाव महामार्गावर वर्षानुवर्षे उभे असलेले व शेकडो पक्ष्यांचा आसरा असलेले पिंपळाचे महाकाय झाड कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय किंवा वन विभागाच्या हस्तक्षेपाशिवाय मुळासकट तोडण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाखाली किंवा हलगर्जीपणामुळे घडलेल्या या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, भरदिवसा सर्रासपणे चाललेल्या या कृत्याचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. या पिंपळाच्या झाडानंतर आता जवळच असलेल्या एका वडाच्या झाडावरही कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. निसर्गाचा मोठा ऱ्हास करणाऱ्या या कृत्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या वृक्षतोडीमुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या या झाडांची तोडणी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का, आणि जर परवानगी होती तर पर्यायी झाडे कुठे लावली आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिल्लोड महसूल विभाग आणि वन विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि पुढील वडाचे झाड वाचवावे, अशी मागणी भवनचे ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळून जाणाऱ्या जळगाव महामार्गावर वर्षानुवर्षे उभे असलेले व शेकडो पक्ष्यांचा आसरा असलेले पिंपळाचे महाकाय झाड कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय किंवा वन विभागाच्या हस्तक्षेपाशिवाय मुळासकट तोडण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाखाली किंवा हलगर्जीपणामुळे घडलेल्या या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या बेकायदेशीर वृक्षतोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, भरदिवसा सर्रासपणे चाललेल्या या कृत्याचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. या पिंपळाच्या झाडानंतर आता जवळच असलेल्या एका वडाच्या झाडावरही कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. निसर्गाचा मोठा ऱ्हास करणाऱ्या या कृत्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

या वृक्षतोडीमुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या या झाडांची तोडणी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का, आणि जर परवानगी होती तर पर्यायी झाडे कुठे लावली आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिल्लोड महसूल विभाग आणि वन विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि पुढील वडाचे झाड वाचवावे, अशी मागणी भवनचे ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुऱ्यातील प्रतापनगरात एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. प्रतापनगरातील कागझीवाला रेसिडेन्समध्ये राहणाऱ्या घाटी रुग्णालयातील डॉक्टर ज्योती देशमुख यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (११ जुलै) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. चोरट्यांनी लाकडी चौकट आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि अवघ्या २० मिनिटांत ही धाडसी चोरी करून ते पसार झाले. दोन सशस्त्र चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. डॉ. ज्योती देशमुख यांचा मुलगा युगंधर हा मुंबईत राहतो. शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉ. ज्योती कामानिमित्त अहिल्यानगरला गेल्या होत्या. शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोन करून घराची दोन्ही दारे उघडी असून कुलूप तुटल्याचे सांगितले. यानंतर डॉ. ज्योती तातडीने शहरात परतल्या असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरीची तक्रार करण्यासाठी गेल्यावर डॉ. ज्योती यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागले. तसेच घटनेच्या तब्बल १२ तासांनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, अवघ्या सहा दिवसांपूर्वीच याच प्रतापनगर परिसरातील व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यातही अशीच धाडसी चोरी झाली होती. एकाच परिसरात लागोपाठ चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त न वाढवल्यास थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. सध्या उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुऱ्यातील प्रतापनगरात एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे. प्रतापनगरातील कागझीवाला रेसिडेन्समध्ये राहणाऱ्या घाटी रुग्णालयातील डॉक्टर ज्योती देशमुख यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (११ जुलै) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. चोरट्यांनी लाकडी चौकट आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि अवघ्या २० मिनिटांत ही धाडसी चोरी करून ते पसार झाले. दोन सशस्त्र चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे.

डॉ. ज्योती देशमुख यांचा मुलगा युगंधर हा मुंबईत राहतो. शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉ. ज्योती कामानिमित्त अहिल्यानगरला गेल्या होत्या. शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना फोन करून घराची दोन्ही दारे उघडी असून कुलूप तुटल्याचे सांगितले. यानंतर डॉ. ज्योती तातडीने शहरात परतल्या असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरीची तक्रार करण्यासाठी गेल्यावर डॉ. ज्योती यांना उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागले. तसेच घटनेच्या तब्बल १२ तासांनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

विशेष म्हणजे, अवघ्या सहा दिवसांपूर्वीच याच प्रतापनगर परिसरातील व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यातही अशीच धाडसी चोरी झाली होती. एकाच परिसरात लागोपाठ चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त न वाढवल्यास थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. सध्या उस्मानपुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    55 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.