logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एका रात्रीत ८ दुकाने फोडणारी टोळी जेरबंद ; मिरजगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका रात्रीत ८ दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला मिरजगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले असून आरोपींकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ८ ते ५ मार्च रोजी सकाळी ९ या कालावधीत मिरजगाव–कडा रोडवरील वीर पाटील कॉम्प्लेक्समधील ८ दुकानांच्या पाठीमागील पत्रे उचकटून अज्ञात आरोपींनी आत प्रवेश केला. त्यानंतर सोलर किटचे १३ कंट्रोलर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, ड्रिल मशीन, स्पॅनर सेट, ट्रॅक्टरचे टेप, स्पीकर वायर, कटर तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याबाबत अभय बाळासाहेब दळवी, रा. तिखी, ता. कर्जत यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ७४/२०२६ भा.न्याय संहिता कलम ३३१(४), ३३४(१), ३०५, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे मनोहर भीमराव पवार (रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अरुण रघुनाथ बर्डे, काळुराम चंदू माळी, ज्ञानेश्वर गंगाराम साळुंखे, सुरेश बाळू माळी आणि भास्कर बबन गांगर्डे (सर्व रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार सर्व आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मनोहर भीमराव पवार याच्याविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन, जि. बीड येथे यापूर्वीही कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, सहायक फौजदार शंकर रोकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल सुनिल खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, अक्षय गार्डे, बळीराम काकडे तसेच होमगार्ड प्रशांत माने, अजय फुलमाळी, अक्षय पवार, दिपक काळे व बिभीषण रणदिवे यांनी केली असून पुढील तपास सफौ. शंकर रोकडे करत आहेत.

16 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
16 hrs ago
1aa7aa1a-3671-411b-95db-2ee9a924956e

एका रात्रीत ८ दुकाने फोडणारी टोळी जेरबंद ; मिरजगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका रात्रीत ८ दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला मिरजगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले असून आरोपींकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ८ ते ५ मार्च रोजी सकाळी ९ या कालावधीत मिरजगाव–कडा रोडवरील वीर पाटील कॉम्प्लेक्समधील ८ दुकानांच्या पाठीमागील पत्रे उचकटून अज्ञात आरोपींनी आत प्रवेश केला. त्यानंतर सोलर किटचे १३ कंट्रोलर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, ड्रिल मशीन, स्पॅनर सेट, ट्रॅक्टरचे टेप, स्पीकर वायर, कटर तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याबाबत अभय बाळासाहेब दळवी, रा. तिखी, ता. कर्जत यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ७४/२०२६ भा.न्याय संहिता कलम ३३१(४), ३३४(१), ३०५, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे मनोहर भीमराव पवार (रा. बीडसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अरुण रघुनाथ बर्डे, काळुराम चंदू माळी, ज्ञानेश्वर गंगाराम साळुंखे, सुरेश बाळू माळी आणि भास्कर बबन गांगर्डे (सर्व रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार सर्व आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मनोहर भीमराव पवार याच्याविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन, जि. बीड येथे यापूर्वीही कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, सहायक फौजदार शंकर रोकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल सुनिल खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे, अक्षय गार्डे, बळीराम काकडे तसेच होमगार्ड प्रशांत माने, अजय फुलमाळी, अक्षय पवार, दिपक काळे व बिभीषण रणदिवे यांनी केली असून पुढील तपास सफौ. शंकर रोकडे करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    1
    -------
(प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी  मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Dattatray Funde
    1
    Post by Dattatray Funde
    user_Dattatray Funde
    Dattatray Funde
    Shevgaon, Ahmednagar•
    14 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    1
    राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली.
या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    19 hrs ago
  • चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    1
    चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 min ago
  • जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    1
    जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    26 min ago
  • आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    1
    आळंदि पुणे : -
पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे...
: माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद
#आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या
#Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.