Shuru
Apke Nagar Ki App…
आमिर सय्यद यांची PSI पदी नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा
युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
आमिर सय्यद यांची PSI पदी नियुक्ती झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.2
- वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र2
- Post by LOKSHAKATI RAKASHAK1
- विक्रम शिंदे/ भोर दि.9 भोर पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.9 प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या मार्गदर्शकसूचने नुसार पंचायत समिती भोर येथे पार पडली.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाचे समसमान उमेदवार निवडून आल्याने अखेर चिट्ठीवर सभापती आणि उपसभापती निवडनुकीत नशिबाची साथ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली आणि दोन्ही पदे मिळाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी जिप माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे , विक्रम खुटवड ,भालचंद्र जगताप आदी उपस्थित होते.1
- भारताचा दणदणीत विजय; कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींचा फटाक्यांची आतिषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष भारताचा दणदणीत विजय; कोल्हापुरात रंगपंचमीसारखा जल्लोष भारताने ICC Men's T20 World Cup स्पर्धेच्या अंतिम सामन्यात New Zealand national cricket team वर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला असून कोल्हापुरातही क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. अंतिम सामन्यात India national cricket team ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 256 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. न्यूझीलंडचा डाव 19 षटकांत 159 धावांवर आटोपला आणि भारताने तब्बल 96 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची बातमी समजताच कोल्हापूर शहरात आनंदाची लाट उसळली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो तरुण आणि नागरिक एकत्र जमले. हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.यावेळी पारंपरिक हलगीच्या तालावर तरुणांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांमुळे वातावरण पूर्णपणे उत्साहाने भारावून गेले होते.अनेकांनी हातात तिरंगा फडकावत भारताच्या विजयाचा अभिमान व्यक्त केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करूनही विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Sanju Samson याला मालिकावीराचा किताब मिळाला. त्याच्या शानदार खेळामुळे भारताच्या विजयात मोठा वाटा असल्याचे क्रिकेटप्रेमींनी सांगितले.क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो.त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरला आहे. कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींनीही हा आनंद रंगपंचमीसारख्या जल्लोषात साजरा करत भारताच्या ऐतिहासिक विजयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भारताच्या या यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.1
- आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews1