महिला दिनानिमित्त काँग्रेसने केला विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान. मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त काँग्रेसने केला विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान. मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना
गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग1
- आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- Post by Dilip Surwase5
- लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- Post by Dilip Surwase7