मेडिकल चालकांच्या बुडाला आग; तक्रारीची धास्ती, कार्यकर्त्यावर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न ! कर्जत तालुक्यातील नियमभंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व हॉस्पिटलची विशेष तपासणी करण्याची मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर काही मेडिकल चालकांच्या बुडाला चांगलीच आग लागल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची लूट करणाऱ्या मोजक्या मेडिकल चालकांनी या तक्रारीची धास्ती घेत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना फोन करून “तुम्ही हे पैशासाठी करता का?”, तुमच्याकडे कोणाची तक्रार आहे का ? “तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करता तक्रार का दिली ?,” अशा स्वरूपाची विचारणा केली जात असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र, मेडिकल चालकांचा कारभार नियमाप्रमाणे असेल तर तपासणीच्या मागणीने एवढी धास्ती का, असा थेट सवाल युक्रांदने केला आहे. मेडिकल स्टोअर्सचे वैध औषध विक्री परवाने, नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती, औषधांची खरेदी-विक्री बिले, उपलब्ध साठा, बॅच क्रमांक, मुदत आणि औषधांची योग्य साठवणूक होते का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी अधिकृत स्रोतांकडून झाली आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी आहे. काही मेडिकलवर २४ तास सेवा देत असल्याचे फलक असतानाही प्रत्यक्षात रात्री सेवा पुरवली जाते किंवा नाही, याची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुदत संपलेली, बनावट किंवा भेसळयुक्त औषधे आढळतात का, तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता न येणाऱ्या औषधांच्या विक्रीची आवश्यक नोंद ठेवली जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा चंग युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून गैरमार्गाने मेडिकल दुकाने चालविणाऱ्यांना दोरीत आणण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मेडिकल चालकांच्या बुडाला आग; तक्रारीची धास्ती, कार्यकर्त्यावर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न ! कर्जत तालुक्यातील नियमभंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व हॉस्पिटलची विशेष तपासणी करण्याची मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर काही मेडिकल चालकांच्या बुडाला चांगलीच आग लागल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची लूट करणाऱ्या मोजक्या मेडिकल चालकांनी या तक्रारीची धास्ती घेत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना फोन करून “तुम्ही हे पैशासाठी करता का?”, तुमच्याकडे कोणाची तक्रार आहे का ? “तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करता तक्रार का दिली ?,” अशा स्वरूपाची विचारणा केली जात असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र, मेडिकल चालकांचा कारभार नियमाप्रमाणे असेल तर तपासणीच्या मागणीने एवढी धास्ती का, असा थेट सवाल युक्रांदने केला आहे. मेडिकल स्टोअर्सचे वैध औषध विक्री परवाने, नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती, औषधांची खरेदी-विक्री बिले, उपलब्ध साठा, बॅच क्रमांक, मुदत आणि औषधांची योग्य साठवणूक होते का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी अधिकृत स्रोतांकडून झाली आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी आहे. काही मेडिकलवर २४ तास सेवा देत असल्याचे फलक असतानाही प्रत्यक्षात रात्री सेवा पुरवली जाते किंवा नाही, याची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुदत संपलेली, बनावट किंवा भेसळयुक्त औषधे आढळतात का, तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता न येणाऱ्या औषधांच्या विक्रीची आवश्यक नोंद ठेवली जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा चंग युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून गैरमार्गाने मेडिकल दुकाने चालविणाऱ्यांना दोरीत आणण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.1
- बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा1
- * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*1
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.1
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- सातारा तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न1