logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर दुसऱ्या दिवशीही ठिय्या; नाशिक,दि.२६ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) व हायवे क्र.२९ बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता.पाऊस,ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शेतकरी व महिला मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठामपणे बसले आहेत.या आंदोलनाला किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला.किसान सभेचे कॉम्रेड राजू देसले आणि मनसेचे नेते सुदाम कोंबडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे सुनील कोथमीरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा देत मार्गदर्शन केले. दरम्यान,रिंगरोडच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पिंपळगाव खांब येथील कै.संपत नथु बोराडे,कै.प्रेमा गोपाळ बोराडे आणि कै.रेखा रामदास मुंडे या तीन शेतकऱ्यांचे अनुक्रमे २२,२३ आणि २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.आंदोलनस्थळी या तिन्ही शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या घटनांमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र दुःख व संतापाचे वातावरण असून,शासनाला अजून किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत?” असा सवाल करण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी यापूर्वीचे उपोषण मागे घेतले होते.मुख्यमंत्री महोदयांसोबत एक बैठक झाली असली तरी त्यानंतरची अपेक्षित बैठक अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ आहे;मात्र न्यायासाठी इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर बसलेल्या शेतकरी महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही,अशी खंत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून आपल्या घर-संसार आणि शेतीचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकरी महिला मुंबईकडे निघाल्या होत्या.मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नाही.त्यामुळे “लाडकी बहीण ही केवळ राजकारण आणि मतांसाठी आहे का? न्याय मागणाऱ्या त्याच लाडक्या बहिणींचा आर्त आवाज शासन कधी ऐकणार?असा सवाल महिलांनी उपस्थित केला. दरम्यान,रिंगरोडच्या भूसंपादन व अलाइनमेंटबाबत शासनाच्या वरिष्ठ स्तरावर चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी केला.त्यांच्या म्हणण्यानुसार,प्रत्यक्षात आतापर्यंत झालेली जमीन खरेदी सुमारे १४ टक्केच आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.आंदोलनाचा दुसरा दिवस उलटूनही जिल्हाधिकारी किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची विचारपूस न केल्याबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी नेते करण गायकर यांनी सांगितले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कार्यक्षम नेते असून ते सकारात्मक दृष्टिकोनातून रिंगरोडचा प्रश्न सोडवतील,असा शेतकऱ्यांना आजही विश्वास आहे.मात्र निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे.आम्हाला आणखी शेतकरी गमवायचे नाहीत.मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी केले. रिंगरोड व हायवे क्र.२९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी आंदोलनाप्रसंगी शिवा तेलंग नवनाथ शिंदे शिवाजी मोरे प्रवीण पाटील वैभव दळवी योगेश गांगुर्डे भारत पिंगळे गोरख जाधव आकाश जाधव शुभम देशमुख सोमनाथ बोराडे संजय नवले त्र्यंबक कोंबडे सुनील कोथमीरे तानाजी गवळी सागर जाधव संदीप दोंदे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
bc92b78a-8162-4bb5-b8df-6bcb94ba82cd

मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर दुसऱ्या दिवशीही ठिय्या; नाशिक,दि.२६ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) व हायवे क्र.२९ बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता.पाऊस,ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शेतकरी व महिला मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठामपणे बसले आहेत.या आंदोलनाला किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला.किसान सभेचे कॉम्रेड राजू देसले आणि मनसेचे नेते सुदाम कोंबडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे सुनील कोथमीरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा देत मार्गदर्शन केले. दरम्यान,रिंगरोडच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पिंपळगाव खांब येथील कै.संपत नथु बोराडे,कै.प्रेमा गोपाळ बोराडे आणि कै.रेखा रामदास मुंडे या तीन शेतकऱ्यांचे अनुक्रमे २२,२३ आणि २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.आंदोलनस्थळी या तिन्ही शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या घटनांमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र दुःख व संतापाचे वातावरण असून,शासनाला अजून किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत?” असा सवाल करण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी यापूर्वीचे उपोषण मागे घेतले होते.मुख्यमंत्री महोदयांसोबत एक बैठक झाली असली तरी त्यानंतरची अपेक्षित बैठक अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ आहे;मात्र न्यायासाठी इंदिरानगर पोलिस स्टेशनबाहेर बसलेल्या शेतकरी महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही,अशी खंत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून आपल्या घर-संसार आणि

8a106377-2e19-4f98-a83a-fcc257880c11

शेतीचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकरी महिला मुंबईकडे निघाल्या होत्या.मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नाही.त्यामुळे “लाडकी बहीण ही केवळ राजकारण आणि मतांसाठी आहे का? न्याय मागणाऱ्या त्याच लाडक्या बहिणींचा आर्त आवाज शासन कधी ऐकणार?असा सवाल महिलांनी उपस्थित केला. दरम्यान,रिंगरोडच्या भूसंपादन व अलाइनमेंटबाबत शासनाच्या वरिष्ठ स्तरावर चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी केला.त्यांच्या म्हणण्यानुसार,प्रत्यक्षात आतापर्यंत झालेली जमीन खरेदी सुमारे १४ टक्केच आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.आंदोलनाचा दुसरा दिवस उलटूनही जिल्हाधिकारी किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची विचारपूस न केल्याबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी नेते करण गायकर यांनी सांगितले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कार्यक्षम नेते असून ते सकारात्मक दृष्टिकोनातून रिंगरोडचा प्रश्न सोडवतील,असा शेतकऱ्यांना आजही विश्वास आहे.मात्र निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे.आम्हाला आणखी शेतकरी गमवायचे नाहीत.मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी,असे आवाहन त्यांनी केले. रिंगरोड व हायवे क्र.२९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी आंदोलनाप्रसंगी शिवा तेलंग नवनाथ शिंदे शिवाजी मोरे प्रवीण पाटील वैभव दळवी योगेश गांगुर्डे भारत पिंगळे गोरख जाधव आकाश जाधव शुभम देशमुख सोमनाथ बोराडे संजय नवले त्र्यंबक कोंबडे सुनील कोथमीरे तानाजी गवळी सागर जाधव संदीप दोंदे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. ​ याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली. मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. ​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. ​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले ​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे." ​शेतकऱ्यांची मुख्य मागणी ​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. • स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. • कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    3
    लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर
नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. 
​ याबाबत सविस्तर वृत्त असे की  प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली.  मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. 
​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले
​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे."
​शेतकऱ्यांची मुख्य मागणी
​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. 
• स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. 
• कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    29 min ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​ NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
    1
    NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.​
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    1
    शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • रस्ता दुरुस्तीसाठी चाललेले महिलांचे नडगाव येथील आंदोलन यशस्वी* काल आंदोलन आणि आज कामाला सुरुवात शहापूर: नडगाव येथे शहापूर मुरबाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज यशस्वी झाले असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. ,शहापूरचे नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक कदम यांनी लेखी पत्र देऊन सदर रस्त्याचे काम आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला होता . अभूतपूर्व यश मिळालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून त्यांनी आज तातडीने कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नडगाव गावातील सुनीता पवार ,विजया बेलवले ,वंदना हरड ,नंदा भोईर, अनिता हरड, हर्षला जागरे, संगीता भालके, सुरेखा भालके ,ताई मडके ,पल्लवी भालके ,आशा माजे ,रेखा पवार ,जयवंती भालके इत्यादी महिलांनी मोलाचं सहकार्य केले होते . आंदोलन यशस्वी करण्यात या महिलांचा सिंहाचा वाटा होता यशस्वी आंदोलन करून आज तातडीने कामाला सुरुवात झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या रणरागीणी महिलांचे कौतुक केले आहे.
    1
    रस्ता दुरुस्तीसाठी चाललेले महिलांचे नडगाव येथील आंदोलन यशस्वी*

काल आंदोलन आणि आज कामाला सुरुवात

शहापूर: नडगाव येथे शहापूर मुरबाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज यशस्वी झाले असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे.
,शहापूरचे नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक कदम यांनी लेखी पत्र देऊन सदर रस्त्याचे काम आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला होता . अभूतपूर्व यश मिळालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून त्यांनी आज तातडीने कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात
नडगाव गावातील सुनीता पवार ,विजया बेलवले ,वंदना हरड ,नंदा भोईर, अनिता हरड, हर्षला जागरे, संगीता भालके, सुरेखा भालके ,ताई मडके ,पल्लवी भालके ,आशा माजे ,रेखा पवार ,जयवंती भालके इत्यादी महिलांनी मोलाचं सहकार्य केले होते . आंदोलन यशस्वी करण्यात या महिलांचा सिंहाचा वाटा होता यशस्वी आंदोलन करून आज तातडीने कामाला सुरुवात झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या रणरागीणी महिलांचे कौतुक केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते  चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.