धुळे जिल्ह्यात वनक्षेत्र वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवा* *:पालकमंत्री जयकुमार रावल *धुळे, दि. 1 मे 2026 (जिमाका वृत्त) :* जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. धुळे वनविभागात पालकमंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज, उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्यासह वनविभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच पर्जन्यमानात वाढ होण्यासाठी वृक्षलागवड व वनसंवर्धन अत्यावश्यक आहे. यासाठी शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. त्यासाठी स्थानिक हवामानाला पूरक प्रजातींची निवड करावी. केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संगोपनासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा. वनसंवर्धनासोबत वन्यजीव वाढीसाठीही प्रयत्न करावेत. वनक्षेत्रात वनतळे तयार करून प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच शिंदखेडा येथे नवीन नर्सरी उभारावी आणि मोर, ससे, कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. वृक्षलागवड उपक्रमात जनसहभाग वाढविण्यावर भर देत त्यांनी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले. या संस्थांना वृक्षलागवडीचे ‘पालकत्व’ देऊन लागवड केलेल्या झाडांचे संगोपन व संरक्षण यावर विशेष भर द्यावा. वृक्षलागवड करताना मोठ्या आकाराची रोपे लावावीत. तसेच ‘इको डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करावा. धुळे शहरात ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. ‘हरित धुळे’ उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीमती सोमराज व उपवनसंरक्षक श्री. नाईकवाडे यांनी वनविभागाच्या विविध योजनांची माहिती सादर केली. 00000

- डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!1
- लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by रुद्रशिव1
- Post by Jafar tarodekar1
- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1