क्रांतिकारी धडक: प्रशासकीय अन्यायाविरोधात 'क्रांतिकारी'चा एल्गार; ग्राउंड रिपोर्ट पाहा. शेतकरी आक्रोश (महाराष्ट्र): पुणे, सोलापूर आणि यवतमाळ पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 'अखिल भारतीय किसान सभे'ने सरकारवर टीका केली असून, केवळ घोषणा न करता तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. पंचनाम्यांच्या संथ प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 🎯 कामगार सुरक्षा आणि टाळेबंदी: इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा फटका बसून कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्तर भारतातील अनेक उत्पादन युनिट्समध्ये 'ले-ऑफ' (कामगार कपात) सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डाव्या कामगार संघटनांनी केंद्र सरकारला पत्राद्वारे इशारा दिला आहे की, नफ्याच्या वेळी फायदा घेणाऱ्या कंपन्यांनी संकटाच्या काळात कामगारांना रस्त्यावर सोडू नये. 🎯 जनगणना २०२६ वरील आक्षेप: १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन जनगणनेच्या प्रक्रियेत विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांपैकी काही वैयक्तिक माहितीशी संबंधित प्रश्नांना प्रगतशील गटांनी विरोध केला आहे. हा डेटा खासगी कंपन्यांना विकला जाण्याची शक्यता 'डाव्या' विचारवंतांनी व्यक्त केली असून, डेटा प्रोटेक्शन कायद्याची मागणी जोर धरत आहे. 🎯 आरोग्य हक्क: दक्षिण भारतात पसरत असलेल्या नवीन व्हायरल स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर, "नफा नव्हे, उपचार महत्त्वाचे" या ब्रीदवाक्यासह आरोग्य कार्यकर्त्यांनी सरकारी इस्पितळांमध्ये मोफत औषधोपचार आणि चाचण्यांची मागणी केली आहे.

- Post by E city news network1
- सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका आक्षेपार्ह स्टेटसबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "ते स्टेटस माझ्या लहान मुलीकडून चुकून ठेवले गेले होते, त्यामुळे कोणीही त्याचा राजकीय अपप्रचार करू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat1
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1