logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येवल्यात भव्य मिरवणूक* *माजी खासदार समीर भुजबळ यांची उपस्थिती* *भिडे वाड्याची प्रतिकृती असलेले भव्य चित्ररथ ठरला मिरवणुकीत मुख्य आकर्षण* येवला,दि.१४ एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येवला शहारात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थिती लावली. येवला शहरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक एकतेचा संदेश देत ही मिरवणूक पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते भिडे वाड्याची प्रतिकृती असलेले भव्य चित्ररथ. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्ररथावर ऐतिहासिक भिडे वाड्याची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्यासोबतच महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याची प्रतिकृती देखील या चित्ररथावर सादर करण्यात आली आहे. हा चित्ररथ केवळ मिरवणुकीपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून समाजप्रबोधनाचा संदेश देणार आहे. सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक प्रवीण बनकर,नगरसेविका पारूल गुजराथी, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक अमजद शेख, नगरसेवक बंटी परदेशी, नगरसेवक जावेद लखपती, राजेंद्र भांडगे, सुहास भांबारे, गुड्डू जावळे, नितीन गायकवाड, मच्छिंद्र थोरात, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, समाधान जेजुरकर, चेतन थोरात, संतोष खैरनार, नवनाथ थोरात, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, समाधान पगारे, सौरभ जगताप, पार्थ कासार, दीपक पवार, युनूस घासी, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

on 14 April
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
on 14 April
282f8943-37cb-4abe-b811-cd8d96b55ea0

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येवल्यात भव्य मिरवणूक* *माजी खासदार समीर भुजबळ यांची उपस्थिती* *भिडे वाड्याची प्रतिकृती असलेले भव्य चित्ररथ ठरला मिरवणुकीत मुख्य आकर्षण* येवला,दि.१४ एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येवला शहारात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थिती लावली. येवला शहरात मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक एकतेचा संदेश देत ही मिरवणूक पार पडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते भिडे वाड्याची प्रतिकृती असलेले भव्य चित्ररथ. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्याचे

9e666ecb-d8bc-4f0c-b085-21efb4c2f569

अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्ररथावर ऐतिहासिक भिडे वाड्याची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्यासोबतच महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याची प्रतिकृती देखील या चित्ररथावर सादर करण्यात आली आहे. हा चित्ररथ केवळ मिरवणुकीपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून समाजप्रबोधनाचा संदेश देणार आहे. सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा उपक्रम

b8afc42b-3f5b-4cf5-9679-9ada382bcb71

महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक प्रवीण बनकर,नगरसेविका पारूल गुजराथी, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक अमजद शेख, नगरसेवक बंटी परदेशी, नगरसेवक जावेद लखपती, राजेंद्र भांडगे, सुहास भांबारे, गुड्डू जावळे, नितीन गायकवाड, मच्छिंद्र थोरात, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, समाधान जेजुरकर, चेतन थोरात, संतोष खैरनार, नवनाथ थोरात, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, समाधान पगारे, सौरभ जगताप, पार्थ कासार, दीपक पवार, युनूस घासी, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!
    1
    नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡
किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली!
📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते…
तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗
👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर?
👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का?
📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    1
    गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    13 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर
    3
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग....
भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती.
बाईट : आमदार संजय केणेकर
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin
    1
    संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन
रवी जाधव सर
मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद
shaha social media bidkin
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    12 hrs ago
  • Post by Vikash Thakare
    1
    Post by Vikash Thakare
    user_Vikash Thakare
    Vikash Thakare
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली.
दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.