logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार शिर्डी, दि. २७प्रवरानगर हे सहकार चळवळीचे प्रेरणास्थान आहे. ग्राम विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून प्रवरा मॉडेल हे देशात ओळखलं जाते. सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून केले. सहकार चळवळीला साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून समृद्ध बनवू असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी केले. प्रवरानगर येथे धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. अमोल खताळ, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, सौ. शालिनीताई विखे-पाटील, ध्रुव विखे-पाटील, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची उपस्थिती होती. प्रवरानगर हे साखर उत्पादनाशिवाय शिक्षण रोजगार आणि ग्रामविकासाचे उत्तम मॉडेल असून येथे सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिलेल स्वप्न पूर्ण होत आहे .तोच वारसा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पुढे चालवला. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त असणारे उत्तम कांबळे यांनी लिखाणातून दिशा देण्याचे काम केले आहे प्रतिभावंतांचा सन्मान प्रवरा नगरने केलेला आहे. सहकाराची ताकद मजबूत करण्यासाठी साहित्य संस्कृतीचा वारसा जपत समाजाला समृद्ध बनवण्याचे काम करू असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रस्ताविकामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची अखंड परंपरा सुरू असून आज राज्यभर शेतकरी दिन साजरा होत आहे हा त्यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचे आणि गौरवाची बाब आहे. पुरस्काराचे हे ३६वे वर्ष असून ही परंपरा सुरू आहे. असे सांगितले. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पुरस्काराच्या बाबत मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रवराच्या नदीकाठाने साखर कारखान्याबरोबर नवा माणूस तयार केला. समाज ,साहित्य संस्कृतीला बळ देणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार मला प्राप्त झाला याबद्दल आनंद होत असून नैतिकतेवर राजकारणाचा पाया इथल्या मातीत आहे. साहित्यिकांच्या मागे समाज हितासाठी लिहिणाऱ्या लेखकांना पाठबळ अशा पुरस्कारातून मिळत असते .हा पुरस्कार समाजातील शोषित व्यक्तीला आवाज आणि चेहरा देण्यासाठी केलेल्या लिखाणाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले . मला लेखक म्हणून समाजाने जे स्वीकारलं या पुरस्कारांची ऊर्जा म्हणून उपयोग होईल तसेच विठ्ठलराव विखे पाटील यांचा कार्य आणि वारसा समाजासमोर येण्यासाठी यावर चित्रपट आणि तसेच त्यांच्या कार्याचा गौरव ग्रंथ निर्माण करण्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात विश्र्वास पाटील म्हणाले की, प्रवरानगर गुणग्राहकतेच महत्वपूर्ण ठिकाण असून अहिल्यानगर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मराठी भाषा जाणीवपूर्वक शिकणे हे एक तंत्र आहे .मातृभाषेच्या माध्यमातून सुसंस्कृत आणि अधिक सर्वगुण संपन्न भावी पिढी निर्माण होत असते. मराठी ग्रंथालय आणि शाळा टिकल्या तर मराठी भाषा आपण वाचवू शकतो, सर्वांनी एकत्र येऊन याबाबत काम करणे आवश्यक असल्याचेही आवाहन विश्वास पाटील यांनी केले. *मान्यवरचा सन्मान* या वर्षी पुरस्कार निवड समितीने 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार' उत्तम कांबळे याशिवाय 'राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' संहिता राजन विशेष साहित्य पुरस्कार' सुरेंद्र दरेकर , राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार' तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार , नाट्यसेवा मधील पुरस्कार' सचिन शिंदे समाजप्रबोधन साठी मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस,तर जिल्हा साहित्य पुरस्कार' निवृत्ती जोरी ,संगमनेर आणि प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार' संजय गोर्डे यांना देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. मान्यवरांच्या हस्ते 'लढत' इतर अन्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुजय विखे पाटील यांनी केले.

4 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Photographer अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
4 hrs ago
57047645-f5da-4b7b-b696-d1911108a8ba

साहित्य, संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार शिर्डी, दि. २७प्रवरानगर हे सहकार चळवळीचे प्रेरणास्थान आहे. ग्राम विकासाचा आदर्श मॉडेल म्हणून प्रवरा मॉडेल हे देशात ओळखलं जाते. सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून केले. सहकार चळवळीला साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून समृद्ध बनवू असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी केले. प्रवरानगर येथे धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. अमोल खताळ, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, सौ. शालिनीताई विखे-पाटील, ध्रुव विखे-पाटील, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची उपस्थिती होती. प्रवरानगर हे साखर उत्पादनाशिवाय शिक्षण रोजगार आणि ग्रामविकासाचे उत्तम मॉडेल असून येथे सामान्य माणसाला विकसित करण्याचे काम विठ्ठलराव विखे पाटील यांनी पाहिलेल स्वप्न पूर्ण होत आहे .तोच वारसा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पुढे चालवला. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त असणारे उत्तम कांबळे यांनी लिखाणातून दिशा देण्याचे काम केले आहे प्रतिभावंतांचा सन्मान प्रवरा नगरने केलेला आहे. सहकाराची ताकद मजबूत करण्यासाठी साहित्य संस्कृतीचा वारसा जपत समाजाला समृद्ध बनवण्याचे काम करू असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रस्ताविकामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची अखंड परंपरा सुरू असून आज राज्यभर शेतकरी दिन साजरा होत आहे हा त्यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचे आणि गौरवाची बाब आहे. पुरस्काराचे हे ३६वे वर्ष असून ही परंपरा सुरू आहे. असे सांगितले. विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पुरस्काराच्या बाबत मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रवराच्या नदीकाठाने साखर कारखान्याबरोबर नवा माणूस तयार केला. समाज ,साहित्य संस्कृतीला बळ देणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने पुरस्कार मला प्राप्त झाला याबद्दल आनंद होत असून नैतिकतेवर राजकारणाचा पाया इथल्या मातीत आहे. साहित्यिकांच्या मागे समाज हितासाठी लिहिणाऱ्या लेखकांना पाठबळ अशा पुरस्कारातून मिळत असते .हा पुरस्कार समाजातील शोषित व्यक्तीला आवाज आणि चेहरा देण्यासाठी केलेल्या लिखाणाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले . मला लेखक म्हणून समाजाने जे स्वीकारलं या पुरस्कारांची ऊर्जा म्हणून उपयोग होईल तसेच विठ्ठलराव विखे पाटील यांचा कार्य आणि वारसा समाजासमोर येण्यासाठी यावर चित्रपट आणि तसेच त्यांच्या कार्याचा गौरव ग्रंथ निर्माण करण्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात विश्र्वास पाटील म्हणाले की, प्रवरानगर गुणग्राहकतेच महत्वपूर्ण ठिकाण असून अहिल्यानगर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मराठी भाषा जाणीवपूर्वक शिकणे हे एक तंत्र आहे .मातृभाषेच्या माध्यमातून सुसंस्कृत आणि अधिक सर्वगुण संपन्न भावी पिढी निर्माण होत असते. मराठी ग्रंथालय आणि शाळा टिकल्या तर मराठी भाषा आपण वाचवू शकतो, सर्वांनी एकत्र येऊन याबाबत काम करणे आवश्यक असल्याचेही आवाहन विश्वास पाटील यांनी केले. *मान्यवरचा सन्मान* या वर्षी पुरस्कार निवड समितीने 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार' उत्तम कांबळे याशिवाय 'राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' संहिता राजन विशेष साहित्य पुरस्कार' सुरेंद्र दरेकर , राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार' तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार , नाट्यसेवा मधील पुरस्कार' सचिन शिंदे समाजप्रबोधन साठी मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस,तर जिल्हा साहित्य पुरस्कार' निवृत्ती जोरी ,संगमनेर आणि प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार' संजय गोर्डे यांना देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. मान्यवरांच्या हस्ते 'लढत' इतर अन्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुजय विखे पाटील यांनी केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    1
    राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत
राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    1
    * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा..
शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे  मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे.
शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.
गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे,  शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार,  ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे,  स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे,  राजेंद्र गावडे,  प्रितम पाटील,  बाळासाहेब म्हस्के,  मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे,  नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
“गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”
“एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख
फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.”
खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
> *विशेष चौकट*
>
> *खिदमत फाउंडेशन, शिरूर*
>
> *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी. आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार... पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    1
    सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी.
आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार...
पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो.
यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला.
यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 min ago
  • खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    1
    खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी
खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६
खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली.
खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली.
“अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    34 min ago
  • आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    1
    आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन
छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    1
    बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार 
बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी  प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान  झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत  महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    1
    हा माझा महाराष्ट्र अभिमान आहे मला ह्या मातीत असल्या चा..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.