मेहकर/*४ वर्षांपूर्वीच्या बेपत्ता प्रकरणातील खुनाचा थरारक उलगडा मेहकर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; २ आरोपी जेरबंद* llमेहकर, चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर छडा लावत मेहकर पोलिसांनी खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे. सूक्ष्म तपास, गुप्त माहिती आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मेहकर येथील एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान चार वर्षांपूर्वीच्या एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाचा धागा समोर आला. पुढील चौकशीत आरोपीने २०२२ मध्ये आपल्या साथीदारासह सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले (वय अंदाजे ३४) यांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी विनोद नवले यांना मेहकर-मोळा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हॉटेलच्या मागील शेतात पुरण्यात आला आणि त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी घटनास्थळी उत्खनन केले असता मानवी सांगाडा सापडला. फॉरेन्सिक तपासातून आणि कपड्यांच्या आधारे मृताची ओळख विनोद नवले अशी पटली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ नोंदवून भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१ व १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार आणि त्यांच्या पथकाने केली. मेहकर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दीर्घकाळ प्रलंबित प्रकरण उघडकीस आले असून त्यांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.... राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षांमध्ये इनकमिंग सुरू...1
- LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले. शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- अकोला बदलत्या काळानुसार बाजारपेठेतील विक्रीच्या पद्धतीही बदलू लागल्या आहेत. अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजारात एका मसाला विक्रेत्याने आपल्या मालाची विक्री करण्यासाठी अवलंबलेली 'गायन शैली' सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अकोट तालुक्यातील दहीहांडा येथील आठवडे बाजार परिसरात हा विक्रेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क स्वतः तयार केलेल्या ओळी गाण्यातून सादर करतो. "काजू, बदाम, खोबऱ्याची वाटी, सारे सामान अखाजीसाठी" अशा यमक जुळवणाऱ्या ओळींच्या माध्यमातून तो मसाल्याची शुद्धता आणि वैविध्य लोकांसमोर मांडत आहे. विशेष म्हणजे, केवळ मालाची जाहिरातच नाही, तर "खोटं बोलून फसवणार नाही आणि फुकटाचे पैसे घेणार नाही" अशा शब्दांतून तो आपल्या व्यवसायातील प्रामाणिकपणाही अधोरेखित करत आहे. आजच्या काळात जिथे मोठ्या जाहिरातींचा खर्च आवाक्याबाहेर असतो, तिथे एका छोट्या व्यावसायिकाने आपल्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून व्यापारात केलेली ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. बाजारात येणारे ग्राहक केवळ मसाला खरेदी करण्यासाठीच नाही, तर या विक्रेत्याचे गाणे ऐकण्यासाठी देखील गर्दी करत आहेत. ग्रामीण भागातील या कलावंताचा व्हिडिओ सध्या अकोला जिल्हा आणि परिसरात चर्चेचा विषय बनला असून, त्याच्या या आगळ्यावेगळ्या मार्केटिंग फड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरात सार्वजनिक नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जात आहे, नगर अध्यक्ष सौं. चित्रा संतोष पवार यांनी तात्काळ नळ योजना पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेशा दिले.1
- छत्रपती संभाजीनगर हादरले; बजाज नगरात महिलेकडूनच महिलेची हत्या छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आ1
- मंठा (प्रतिनिधी) – मंठा तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्पन्न व रहिवासी दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देत कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न व रहिवासी दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून हे दाखले जलद गतीने उपलब्ध व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाही स्थानिक पातळीवर अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू विभागात जबाबदारीने काम करणाऱ्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.1
- एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.1