logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नगर पंचायत अग्निशमन विभागाने , अचानक आगीने पेटलेल्या ट्रकची आग तत्काळ विझविली! जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.

17 hrs ago
user_ADIL KHAN
ADIL KHAN
Local News Reporter Badnapur, Jalna•
17 hrs ago

नगर पंचायत अग्निशमन विभागाने , अचानक आगीने पेटलेल्या ट्रकची आग तत्काळ विझविली! जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    1
    सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला  महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा
छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Isak Shaha
    1
    Post by Isak Shaha
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मंठा (प्रतिनिधी) – मंठा तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्पन्न व रहिवासी दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देत कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न व रहिवासी दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून हे दाखले जलद गतीने उपलब्ध व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाही स्थानिक पातळीवर अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू विभागात जबाबदारीने काम करणाऱ्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    मंठा (प्रतिनिधी) – मंठा तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्पन्न व रहिवासी दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देत कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न व रहिवासी दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून हे दाखले जलद गतीने उपलब्ध व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाही स्थानिक पातळीवर अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू विभागात जबाबदारीने काम करणाऱ्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    1
    दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    1
    “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • llमेहकर, चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर छडा लावत मेहकर पोलिसांनी खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे. सूक्ष्म तपास, गुप्त माहिती आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मेहकर येथील एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान चार वर्षांपूर्वीच्या एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाचा धागा समोर आला. पुढील चौकशीत आरोपीने २०२२ मध्ये आपल्या साथीदारासह सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले (वय अंदाजे ३४) यांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी विनोद नवले यांना मेहकर-मोळा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हॉटेलच्या मागील शेतात पुरण्यात आला आणि त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी घटनास्थळी उत्खनन केले असता मानवी सांगाडा सापडला. फॉरेन्सिक तपासातून आणि कपड्यांच्या आधारे मृताची ओळख विनोद नवले अशी पटली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ नोंदवून भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१ व १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार आणि त्यांच्या पथकाने केली. मेहकर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दीर्घकाळ प्रलंबित प्रकरण उघडकीस आले असून त्यांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    llमेहकर, चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर छडा लावत मेहकर पोलिसांनी खुनाचा धक्कादायक उलगडा केला आहे. सूक्ष्म तपास, गुप्त माहिती आणि आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मेहकर येथील एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान चार वर्षांपूर्वीच्या एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाचा धागा समोर आला. पुढील चौकशीत आरोपीने २०२२ मध्ये आपल्या साथीदारासह सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले (वय अंदाजे ३४) यांचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपींनी विनोद नवले यांना मेहकर-मोळा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हॉटेलच्या मागील शेतात पुरण्यात आला आणि त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकून पुरावे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी घटनास्थळी उत्खनन केले असता मानवी सांगाडा सापडला. फॉरेन्सिक तपासातून आणि कपड्यांच्या आधारे मृताची ओळख विनोद नवले अशी पटली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ नोंदवून भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०१ व १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार आणि त्यांच्या पथकाने केली.
मेहकर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दीर्घकाळ प्रलंबित प्रकरण उघडकीस आले असून त्यांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले. शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी
वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले.
शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani
    1
    पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani  #Pathri  #parbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.