logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अहिंसा आणि शांततेचा संदेश; महावीर जयंतीला भव्य मिरवणूक कोल्हापूर, ३१ (सिटी न्यूज नेटवर्क) भगवान महावीर जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील सकल जैन श्वेतांबर राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेत घोडे, बैलगाड्या, बग्गी, घोडागाड्या तसेच बँड आणि हलगी यांचा आकर्षक समावेश होता. चांदीच्या रथामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. “जियो और जीने दो” आणि “अहिंसा परमो धर्म” हा भगवान महावीरांचा संदेश समाजात रुजावा तसेच देश-विदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परमपूज्य आचार्य चिरंतनरत्न सुरीश्वरजी महाराज आदी ठाणा, पन्यास विनयशेखर विजयजी महाराज, कृतार्थशेखर महाराज तसेच कोल्हापूरातील विविध जैन संघात विराजमान असलेले साधू-साध्वीजी भगवंत उपस्थित होते. शोभायात्रेत सहभागी झालेले सर्व श्रावक पांढऱ्या वेशात तर श्राविका लाल चुनरीत सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. या शोभायात्रेत श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर (गुजरी), श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर, श्री वासुपूज्य स्वामी जैन श्वेतांबर मंदिर, श्री आशापुरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, शत्रुंजय सोसायटी जैन श्वेतांबर मंदिर, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर (ग्रीन एमराल्ड), नवग्रह मंदिर मिराभक्ती, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट आदींसह विविध जैन संघ, ट्रस्टचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामुदायिक वरघोडा गुजरी मंदिर येथून सुरू होऊन महाद्वार रोड, भेंडे गल्ली, शिवाजी चौक, शिवाजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी मंदिर, आईसाहेब पुतळा, महानगरपालिका, पुन्हा शिवाजी चौक, गुजरी बाजार मार्गे गुजरी मंदिर येथे विसर्जित झाला. महावीर जन्मकल्याणकानिमित्त १५ वर्षांखालील सुमारे १३० मुला-मुलींनी आयंबिल केले, तर कोल्हापूर संघातील श्रावक-श्राविकांनी सुमारे ४५० आयंबिल साधना केली. या प्रसंगी जैन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. वरघोडा विसर्जनानंतर गुजरी आराधना भवन येथे गुरु वंदना, मांगलिक प्रवचन झाले. त्यानंतर बूंदी-शेव यांची प्रभावना देण्यात आली.

1 hr ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
d927223a-2df7-4d49-80a5-1f7adefc8e2d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ​जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. ​ ​जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. ​त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. ​बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.
    1
    ​जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला.
​
​जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते.
​त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला.
​बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.
    1
    भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    2
    इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    1
    बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.
    2
    विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    1
    हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.