Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आणि सर्वात भक्कम आधार देणाऱ्या श्री गुरुद्वारा बंगला साहिब आणि त्यांच्या प्रबंधक समितीची आज प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. संकटाच्या काळात जात, धर्म किंवा पंथ नव्हे, तर माणुसकीच सर्वात मोठी ठरते, ही भावना व्यक्त करत गुरुद्वाराने दाखवलेला आधार, सेवा आणि संवेदनशीलता हा मानवतेचा सर्वोच्च आदर्श असल्याचे नमूद करण्यात आले आहे. श्री गुरुद्वारा बंगला साहिब यांच्या या निस्वार्थ सेवेच्या परंपरेला मनःपूर्वक सलाम करत मानवतेसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आणि सर्वात भक्कम आधार देणाऱ्या श्री गुरुद्वारा बंगला साहिब आणि त्यांच्या प्रबंधक समितीची आज प्रत्यक्ष भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. संकटाच्या काळात जात, धर्म किंवा पंथ नव्हे, तर माणुसकीच सर्वात मोठी ठरते, ही भावना व्यक्त करत गुरुद्वाराने दाखवलेला आधार, सेवा आणि संवेदनशीलता हा मानवतेचा सर्वोच्च आदर्श असल्याचे नमूद करण्यात आले आहे. श्री गुरुद्वारा बंगला साहिब यांच्या या निस्वार्थ सेवेच्या परंपरेला मनःपूर्वक सलाम करत मानवतेसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन म्हणजे विरोधकांचा बेनामी आंदोलन करण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिल्लीतील या आंदोलनाच्या स्वरूपावर बोट ठेवत त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.1
- देशभरात गाजत असलेल्या कथित NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. कॉक्रोज जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे देशव्यापी स्वरूप प्राप्त झालं होतं. मात्र, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाने आता नवं राजकीय वळण घेतलं आहे. या घटनेनंतर हॉस्पिटलमधून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, "मै अभी भी जिंदा हुं" असे त्यांनी म्हटले आहे.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे आयोजित होणाऱ्या उरूसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली आहे. या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक पार पडली.1
- राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेबाहेर काळे कपडे परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत 'नरेंद्र मोदी डरपोक' आणि 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' अशा जोरदार घोषणा दिल्या.1
- औरंगाबादच्या सिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि 'महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३' अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत मस्के आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पठाडे, वैभव भालेराव, समाज कल्याण विभागाच्या प्रतिनिधी प्रतीक्षा भालेराव, प्रिया बनसोड, अब्दुल्लाही आदम, उमाकांत बोराडे व मनोहर अपार यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि ते समाजाचे जबाबदार नागरिक बनावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात भाऊसाहेब पठाडे यांनी विद्यार्थ्यांना जादूटोणा विरोधी कायद्याची सविस्तर माहिती दिली. प्रयोगांच्या माध्यमातून भूत उतरवणे, करणी, भानामती, नरबळी आणि चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक हे प्रकार कायद्यानुसार कसे गुन्हे ठरतात, हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. आजारपणात मांत्रिकांऐवजी योग्य वैद्यकीय उपचार घेण्याचे आणि प्रत्येक घटनेमागील वैज्ञानिक कारण समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक निशांत मस्के यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले, तर विद्यार्थ्यांनीही अंधश्रद्धेवर प्रश्न विचारून यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश काळे यांनी केले आणि आभार रमेश सोनवणे यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, रमेश परदेशी, भास्कर सागरे, अरविंद सोनवणे, अमोल ताटू, गजानन दौड, पंकज सावंत, संगीता तायडे, नम्रता वडमारे, हर्षदा सानान्से आणि शैलेश मोरे यांनी परिश्रम घेतले.1
- मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.1
- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. दिल्ली येथे काल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले होते, ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्या कारवाईच्या विरोधात आज क्रांती चौकात झालेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.4