*खासदार डॉ.अजित गोपछडे व हुडको यांच्या पुढाकारातून नांदेड मनपा शाळांचा कायापालट; शालेय फर्निचरचे थाटात लोकार्पण* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड,२९ एप्रिल :- खासदार डॉ.अजित गोपछडे आणि हुडको (HUDCO) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR Fund) नांदेड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शालेय फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फर्निचरचा लोकार्पण सोहळा दिनांक २९.०४.२०२६ रोजी पालिकेच्या शाळा क्र.०१, गांधी पुतळा, वजिराबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना नांदेड महानगरपालिकेच्या शाळांमधील भौतिक सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने *खासदार डॉ.अजित गोपछडे* यांनी *हुडकोकडे* पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, हुडकोच्या वतीने *पालिकेच्या ११ शाळांना एकुण ५५० आधुनिक बाक (Benches)* आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा बसण्याचा प्रश्न सुटणार असून त्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणार आहे. या सोहळ्याला खासदार डॉ.अजित गोपछडे यांच्यासह महापौर सौ.कविता संतोष मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, शिक्षण व महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा वैजु सोनी पाटील, उपसभापती निरंजना राजू लांडगे, सभागृह नेता ॲड.महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अजिजित वायकोस, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, महानगरपालिकेचे स्थानिक नगरसेवक, शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *खासदार डॉ.अजित गोपछडे यांचे मनोगत* यावेळी बोलताना खासदार डॉ.अजित गोपछडे म्हणाले की, "महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच आधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात, हे आमचे ध्येय आहे. हुडकोने दिलेल्या या योगदानामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नक्कीच बळ मिळेल.भविष्यातही नांदेडमधील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." त्याचप्रमाणे शहरातील होतकरु गरजु विद्यार्थ्यांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी व त्यांना व्यायामाची चांगली सवय जडण्यासाठी पालिकेतील प्रत्येक शाळेत ओपन जीम तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.मशिन्स उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा करताना प्रत्येक शाळेत दोन संगणक संच उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदारांनी दिले आहे. *नांदेडकरांकडून स्वागत* महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रथमच अशा प्रकारचे दर्जेदार आणि सुसज्ज फर्निचर उपलब्ध झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. खासदारांच्या या विशेष प्रयत्नांमुळे शाळांची पटसंख्या वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास शिक्षण प्रेमींनी व्यक्त केला आहे.

- Post by Today One Live1
- नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे4
- कछरा का दिकत1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- जळकोट1
- टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष1
- Post by नागनाथ ससाने1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.3