राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रकाश भोंगाळे सन्मानित. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रकाश भोंगाळे सन्मानित मायणी दि.11 - प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (MSCERT) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६' चा जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), उत्साहात पार पडला. या सोहळ्यात खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेमळा येथील उपक्रमशील शिक्षक प्रकाश शिवाजी भोंगाळे यांना त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाएट साताराचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ व्याख्याता डोंबाळे सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता फरांदे, कृष्णत फडतरे, श्रीम.अन्नपूर्णा माळी, संदिप जगताप तसेच ज्ञानप्रकाश फाऊंडेशनचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रकाश भोंगाळे यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविलेल्या 'नवोपक्रमा'ची जिल्हा स्तरावर दखल घेण्यात आली. या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या उपक्रमात यशस्वी होण्यासाठी त्यांना गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते,विस्तार अधिकारी संगिता गायकवाड,केंद्रप्रमुख मुलाणी,चंद्रकांत मोरे , रमजान ईनामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता खिलारे आणि उपक्रमशील शिक्षिका पूर्वा भोंगाळे यांचेही विशेष सहकार्य मिळाले. ग्रामीण भागातील शाळेत राहून तंत्रज्ञान आणि नवनवीन शैक्षणिक प्रयोगांची सांगड घालत प्रकाश भोंगाळे यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल खटाव तालुक्यातील शिक्षण विभाग, शिंदेमळा ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील शिक्षक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे. फोटो - प्रकाश भोंगळे यांचा सन्मान करताना उपस्थित मान्यवर.

- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1