मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न पीक नुकसानीची शासन दखल घेणार, शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही पालकमंत्री अतुल सावे • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिलात सवलत • ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम • आरोग्य सुविधांचे बळकटीकरण • रोजगार महाकुंभमध्ये युवकांना सहभागी होण्याचे आवाहन • सीताखंडी घाटातील अपघाताबद्दल शोक व्यक्त नांदेड (जिमाका), दि. 17 सप्टेंबर : जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शासनाच्यावतीने ग्वाही देतो, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यसभेचे सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नागरिक व पत्रकार आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ४८७ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून, त्यापैकी ६४ हजार २७९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत ४८८ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी कृषी क्षेत्रातील ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीचे ना-देय प्रमाणपत्र देण्यात येत असून, बँकांनी त्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच वीजबिलात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जाचा भार कमी करणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वीज खर्चात दिलासा देणे, हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहे. या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्र्यांनी आभार मानले. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ९६६ कोटी रुपयांचे, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्यापोटी ७६ कोटी ५३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला शासनाने विशेष प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्य शासनामार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेवा सेतू शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे, इनोव्हेशन चॅलेंज, विकसित भारत संकल्प यात्रा, नमो सेवागाथा, जल-जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती” या संकल्पनेतून युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एकाच दिवशी राज्यभरात ५०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यात २२ ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील युवकांनी या रोजगार मेळाव्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरून ५०० खाटांपर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच कंधार, बिलोली आणि हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात येत असून, जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही नवीन आरोग्य सुविधांची उभारणी सुरू आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ३७ अत्याधुनिक डायलिसिस यंत्रे, तीन सीटी स्कॅन यंत्रे, एमआरआय सेवा आणि सोनोग्राफी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गरजू व पात्र रुग्णांसाठी आधार ठरत असून, जिल्ह्यातील १ हजार ९७४ रुग्णांना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ हजार ६३१ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी बँकांमार्फत २०६ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांना सुमारे २२ कोटी ८४ लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ५१६ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी मुखेड व कंधार तालुक्यात संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून झालेल्या प्रकरणांतील २० मृत व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रस्ते आणि शासकीय इमारतींची विविध विकासकामे वेगाने सुरू असून, ती पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५३२ गावांपैकी १ हजार ४५४ गावे हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच १ हजार ३६९ गावांमध्ये सांडपाणी निचरा आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदी योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना निर्धारित उद्दिष्टानुसार लाभ देण्यात येत असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात झालेल्या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून त्यांनी जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, दिवंगत माजी आमदार प्रदीप (नाईक) जाधव यांच्या शोक प्रस्तावाचा कार्यवृत्तांत व स्मृतीपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांच्या नातेवाईकांना प्रदान करण्यात आले. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना बॅंक कर्ज मंजुरीचे पत्र पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे व श्रीमती अंजली नातू यांनी केले.

- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.3
- धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए1
- देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.2
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1