विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध; फोटोला जोडे मारून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप* *विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध; फोटोला जोडे मारून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप* छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते श्री. विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्याच्या समर्थकांनी केलेल्या शाईफेक व दमदाटीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'भोंदू' संग्राम भंडारे याच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. काही दिवसापुर्वी एका कार्यक्रमादरम्यान वैचारिक मुद्द्यांवरून वाद झाला होता. यावेळी समोरच्या बाजूने युक्तिवाद करण्याऐवजी संग्राम भंडारे आणि त्याच्या जमावाने विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करून त्यांना धक्काबुक्की केली. लोकशाहीमध्ये आपले मत मांडणाऱ्या नेत्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला करणे, ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याची भावना पदाधिकारी,कार्यकर्त्यांमध्ये आहे.या आंदोलनाला जिल्हाअध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे,शहर कार्याध्यक्ष आशिष पवार,उद्धव बनसोडे,राजेंद्र चव्हाण,मिलिंद सोनपसारे,ललिताताई मगरे,अनुराधा सोनपसारे,भाग्यश्री अष्टेकर,ऋतुजा मगरे,विष्णू जगताप,अनिल डोंगरे,आनंद मगरे,शेलेंद्र खन्ना,रवी मगरे,रतन पगारे, आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- पुण्यात ट्रॅफिक महिला पोलिसाचा संयम सुटला.. ट्रक चालकरावर थेट दगड उगारला.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.1