Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यातील दुहेरी खुनाचा फैसला उद्यावर; न्यायालयात उसळली गर्दी, बाजीराव पवार म्हणाले – “माझ्यावर अन्याय झाला” धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
Dhule News 24
धुळ्यातील दुहेरी खुनाचा फैसला उद्यावर; न्यायालयात उसळली गर्दी, बाजीराव पवार म्हणाले – “माझ्यावर अन्याय झाला” धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..1
- लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती1
- क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात! छत्रपती संभाजीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले. सवाल: लोकशाही की दडपशाही? या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत: १. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार? २. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही? ३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन? काय घडलं नेमकं? आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती! वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश? तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला. कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?" सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिनिधी: गौतम हिवराळे1
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.1